क्राईम

श्रावस्तीनगरमध्ये घरफोडे, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील श्रावस्तीनगर भागात एक घरफोडून चोरट्यांनी 2 लाख 10 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. हिमायतनगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 28 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. जांब (बु) ता.मुखेड येथे 70 हजारांचे सोयाबिन चोरले आहे.नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऍटोमधील एका प्रवाशावर जबरी चोरी घडली आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरीला गेली आहे.
श्रावस्तीनगर येथील शिलाबाई प्रकाश हनमंते या 29 डिसेंबर 2021 रोजी आपले घर बंद करून त्यास कुलूप लावून आपल्या कुटूंबासह कांही कामासाठी मुंबई येथे गेल्या होत्या. 31 जानेवारीला त्यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेवून चोरट्यांनी ते घर फोडले. घरातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि घरगुती सामान असा 2 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
हिमायतनगर येथील राजेश उत्तम जाधव हे 31 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 ते 1 जानेवारी पहाटे 9.45 दरम्यान घरी नव्हते. या बंद घराचे दार तोडून चोरट्यांनी त्यातून 4 हजार रुपये रोख रक्कम, टी.व्ही., चांदीचे दागिणे असा 28 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक चौधरी अधिक तपास करीत आहेत.
मौजे जांब ता.मुखेड येथे राजू लालबा ओटवे यांनी आपला ट्रक न्यु महाराष्ट्र हॉटेल जांब येथे 31 जानेवारी रोजी उभा केला. 1 फेब्रुवारी रोजी ते पुन्हा ट्रक घेवू जाण्यासाठी आले असतांना त्यातील 50 किलो ग्रॅम वजनाचे 29 पोते भरलेले सोयाबीन 14.5 क्विंटल, किंमत 70 हजार रुपयांचे कोणी तरी चोरून नेले होते. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुधाकर कोंडिबा चिंतोरे हे 1 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजता बळीरामपूर येथून ऍटो क्रमांक एम.एच.26 जी.6196 मध्ये बसून जात असतांना एमआयडीसी रस्त्यावर त्यात दोन जण त्यांच्या आजूबाजूला बसले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील दोन हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. नांदेड ग्रामीण पेालीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे अधिक तपास करीत आहेत.
शुभम सुरेश पवार यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.आर.6782 ही 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी 31 जानेवारी -1 फेबु्रवारीच्या रात्री बऱ्यामसिंघ नगर भागातून चोरीला गेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पांचाळ अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.