नांदेड(प्रतिनिधी)-महिलेशी संबंधीत गुन्हा दाखल असतांना राष्ट्रवादी कॉंगे्रसने आपल्या पक्षाचे तिकिट देवून शेख जाकीर शेख सगीरला अर्धापूर नगर पंचायतीमध्ये उभे केले. कोणाच्या तरी दुर्देवाने त्याचा विजय झाला. विजय होताच जिल्हाधिकारी नांदेड आणि मुख्याधिकारी नगर पंचायत यांना आदेश देण्याच्या भाषेत एक पत्र लिहुन शेख जाकीर शेख सगीरने केलेली मागणी म्हणजे …. आहे.
अर्धापूर नगरपंचायतची निवडणूक झाली. त्यात प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने महिलेबद्दल असभ्य वर्तनकरून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असतांना त्याचा माहिती राष्ट्रवादी पक्षाने आपल्यावतीने प्रसारीत केली नाही अशी माहिती प्रसारीत करा असे आदेश मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलेले होते. अर्धापूरमधील प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणूक लढविणाऱ्या आणि त्या प्रभागात जीवन जगणाऱ्या लोकांपैकी कोणाच्या तरी दुर्देवाने पुढील पाच वर्षासाठी शेख जाकीर शेख सगीर प्रभाग क्रमांक 3 च्या नगरसेवक पदावर निवडूण आला. आल्याबरोबर 1 फेबु्रवारी रोजी त्याने जिल्हाधिकारी नांदेड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नगर पंचायत अर्धापूर यांना एक पत्र दिले आहे. या पत्रात महाराष्ट्र राज्य नगर विकास विभागाच्या शासन परिपत्रकाचा उल्लेख करून नगर पंचायतीमध्ये महिला नगरसेविकांचे प्रतिनिधी येतील, कामात हस्तक्षेप करतील, अधिकाऱ्यांच्या आजूबाजूला बसतील यावर बंधन येणे गरजेचे आहे असे शेख जाकीरला वाटते. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार याबाबत त्वरीत कार्यवाही करून त्यांना कामात हस्तक्षेप करण्यात, अधिकाऱ्यांच्या शेजारी बसण्यास मनाई करण्याचा आदेश अभिलेखावर घेवून नगर पंचायत अर्धापूरच्या नोटीस बोर्डावर व फलकावर पारीत करावा आणि या बाबत मला उलट टपालाद्वारे तात्काळ माहिती द्यावी असे शब्द या पत्रात लिहिले आहेत.
नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याने अर्थात शेख जाकीर शेख सगीरने अनेक अर्जांवर पृष्ठांकन करून घेतलेले आहे. त्याचे भरपूर उपयोग सुध्दा केलेले आहेत. पण या अर्जावर पृष्ठांकन करतांना जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी यात लिहिलेली भाषा आणि दिलेला उलट टपाली माहिती देण्याचा आदेश लक्षात घेण्याची गरज आहे. आता फक्त बदल एवढा झाला आहे की, पुर्वीचा लेटर पॅड वेगळा आणि हा वेगळा या लेटर पॅडवर राष्ट्रवादीचे प्रमुख शरदचंद्र पवार यांचा फोटो सुध्दा लावण्यात आला आहे. 12 फेबु्रवारी रोजी नगर पंचायत अर्धापूर येथील अध्यक्षाची निवड होणार आहे. तेथे कॉंगे्रस पक्षाचा प्रतिनिधी विराजमान होणार आहे हे ही तेवढच सत्य आहे. नगरपंचायत अर्धापूरच्या हद्दीत शासकीय जागांवर झालेले अतिक्रमण नवीन नगर पंचायतीचे अध्यक्ष व सदस्य काढणार आहेत हे सुध्दा आता बोलले जात आहे.
