महाराष्ट्र

नांदेड जिल्हा परिषदेतील उपशिक्षणाधिकारी प्राथमिक यांना माहिती आयुक्तांनी 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला 

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या हिंगोली जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या संदीपकुमार सोनटक्केची माहिती न देणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेतील माहिती अधिकारी तथा उपशिक्षाणाधिकारी प्राथमिक यांना राज्य माहिती आयुक्त खंडपीठ औरंगाबाद दिलीप धारुरकर यांनी 15 हजार रुपये दंड ठोठावला आहे. हे 15 हजार रुपये वसुल करण्याची जबाबदारी नांदेड जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे. 
                           हिंगोली शहरात राहणारे सुरेश नंदकिशोर व्यास यांनी दि.11 जून 2019 रोजी माहिती अधिकारानुसार नांदेड जिल्हा परिषदेत अर्ज दिला होता. त्यानुसार मागे नांदेड जिल्हा परिषदेत कार्यरत असलेलेशिक्षणाधिकारी  संदीपकुमार सोनटक्के यांच्याविरुध्द सुरू असलेल्या विविध विभागीय चौकशांची माहिती आणि त्या चौकशीतील संचिकेत उपलब्ध असलेल्या कागदपत्रांसह माहिती मागितली होती. 
                      तत्कालीन माहिती अधिकरी तथा उपशिक्षणाधिकारी  यांनी माहिती दिली नाही म्हणून या प्रकरणाचे पहिले अपील करण्यात आले. पहिला अपीलामध्ये सुध्दा सुरज व्यास यांना माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे सुरेज व्यास यांनी या प्रकरणाचे दुसरे अपील क्रमांक 8139/2019 माहिती आयुक्त खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे सादर केले. दुसऱ्या अपीलानुसार खंडपीठ औरंगाबाद येथे 23 फेबु्रवारी 2021 रोजी निर्णय झाला आणि सुरज व्यास यांना माहिती देण्यास सांगितले. तरीपण जिल्हा परिषद नांदेडने त्यांना माहिती दिली नाही. 
                     त्यानंतर माहिती आयुक्तांनी सुरज व्यास यांना माहिती देण्यासाठी विहित मुदतीत कार्यवाही झाली नाही म्हणून माहिती अधिकाऱ्याने 30 दिवसात प्रत्यक्ष हजर राहून त्यांच्याविरुध्द माहिती अधिकारातील कलम 20 नुसार कार्यवाही का करू नये याबाबत खुलासा द्यावा म्हणून  वेळ दिला. स्मरणपत्र देऊन माहिती आयुक्तांनी एक जास्त संधी दिली. पण याबद्दलची कोणतीच माहिती माहिती आयुक्तांना देण्यात आली नाही. त्यामुळे माहिती आयुक्तांनी विहित मुदतीत सुरज व्यास यांना माहिती उपलब्ध करून दिली नाही म्हणून तत्कालीन जनमाहिती अधिकारी तथा उपशिक्षाणाधिकारी प्राथमिक यांच्याविरुध्द 15 हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे.                           नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही 15 हजार रुपये दंडाची रक्कम वसुल करून ती दंडाची 15 हजार रुपये रक्क्म शासकीय लेखाशिर्षात जमा करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. हा निर्णय 20 डिसेंबर 2021 रोजी पारीत करण्यात आलेला आहे. हा निर्णय जावक क्रमांक 15855 दि.31 डिसेंबर 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आणि संबंधीत जनमाहिती अधिकारी मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आला आहे. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *