नांदेड

कोरोना बातमी;शनिवारी मृत्यू नाही;रुग्ण संख्या ३८१; सुट्टी ९८४ जणांना

नांदेड,(प्रतिनिधी)- आज शनिवारी  कोरोना विषाणूने एकूण ३८१ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २८९२ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९४.५१ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात १७.९४ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ५९.०५ टक्के रुग्ण आहे.
                       जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २९ जानेवारी रोजी कोरोना बाधेने एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज ३८१ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
                         नांदेड मनपा विलगिकरणातून-७७८, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०५, खाजगी रुग्णालय-१०, तालुक्यातील गृह विलगीकरण-१८७,जिल्हा रुग्णालय कोवीड रुग्णालय-०४,अश्या ९८४ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९५६७८ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९४.५१ टक्के आहे.
             आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-२२५, मुखेड-२०, नांदेड ग्रामीण-३९, नवट-०४, कंधार- ०४, नायगाव-१४,  मुदखेड-०३, बिलोली-१०, देगलूर-०३, लोहा-०८,अर्धापूर-३,धर्माबाद-०५,हिमायतनगर-०२,उमरी-०२,  हदगाव-०२,  भोकर-०४,अकोला-०१,   परभणी-०७, हिंगोली-०५ , यवतमाळ-०४, पंजाब-०२, वाशीम-०१,तेलंगणा-०२, राजस्थान -०१, तेलंगणा-०४, औरंगाबाद-०२,नासिक-०१,बिहार -०५,अहमदनगर-०१,अमरावती-०१, असे आहेत.
                          आज २१२३ अहवालांमध्ये १६४४ निगेटिव्ह आणि ३८१ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०१२३५ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ३३५ आणि ४६ अँटीजेन तपासणीत असे एकूण ३८१ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ८६ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब १२ आहेत.
                                आज कोरोनाचे २८९२ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१५३२, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-१२९३,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-३४, खाजगी रुग्णालयात- ३२, किनवट-०१, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०४ रुग्ण आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *