नांदेड

कोरोना बातमीत आनंद;शुक्रवारी मृत्यू नाही;रुग्ण संख्या घटली;टक्केवारी घसरली;१०२२ जणांना सुट्टी

नांदेड,(प्रतिनिधी)- आज शुक्रवारी कोरोना विषाणूने एकूण ३५३ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३४९५ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९३.९० झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात १९.२४ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ४०.७९ टक्के रुग्ण आहे.
                       जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २८ जानेवारी रोजी कोरोना बाधेने एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज ३५३ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
                         नांदेड मनपा विलगिकरणातून-७८४, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०३, खाजगी रुग्णालय-०६, तालुक्यातील गृह विलगीकरण-२२८,किनवट-०१,अश्या १०२२ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९४६९४ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९३.९० टक्के आहे.
             आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-१४४, मुखेड-०८, नांदेड ग्रामीण-३५, किनवट-०८, मुदखेड-११, माहूर-२६,  बिलोली-०७, देगलूर-१०, लोहा-०७,कंधार- १२, नायगाव-०६,  धर्माबाद-३२,हिमायतनगर-०५,उमरी-०९,हदगाव-०२,  भोकर-०४, लातूर-०१, परभणी-०७, हिंगोली-०५,यवतमाळ-०२, पंजाब-०१, आदिलाबाद-०२,हैद्राबाद-०१, उत्तरप्रदेश -०१, तेलंगणा-०४, दिल्ली -०१,बीड-०१,अमरावती-०१, असे आहेत.
                          आज १८३४ अहवालांमध्ये १२८६ निगेटिव्ह आणि ३५३ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १००८५४ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत २७६ आणि ७७ अँटीजेन तपासणीत असे एकूण ३५३ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब १७६ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब १९ आहेत.
                                आज कोरोनाचे ३४९५ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -२२४५, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-११७५,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-३२, खाजगी रुग्णालयात- ३८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-०४,किनवट-०२, असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०३ रुग्ण आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *