नांदेड

विकासाची प्रक्रिया अव्याहत सुरू राहणारी प्रक्रिया आहे-अशोक चव्हाण

72 वा भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा

नांदेड(प्रतिनिधी)-विकासाची प्रक्रिया ही अव्याहतपणे सुरू राहणारी एक प्रक्रिया आहे. नांदेड जिल्ह्यात विकास कामांसाठी मी सातत्याने प्रयत्नशिल आहे असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
आज 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर झाला. याप्रसंगी व्यासपीठावर पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.विपीन, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. यामध्ये एक महिला व एक पुरूष असे दोन प्लॉटून सहभागी झाले होते. कोविड कालखंडातील नियमावलीनुसार यंदाच्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात इतर सर्व प्रक्रियांना बंद ठेवण्यात आले होते. सकाळी 9.15 वाजता अशोक चव्हाण यांचे आगमन झाले आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगितासह पोलीसांनी राष्ट्रध्वजाला वंदन केले.

याप्रसंगी पुढे बोलतांना अशोक चव्हाण यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरीक व सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभकामना दिल्या. स्वातंत्र्य समता आणि बंधूता या मुल्यांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आणि घटना समितीतील सदस्यांनी मिळून भारतीय राज्य घटनेचा पाया मजबुत केला होता. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात त्यास भारतीय राज्य घटना महत्वाचे कारण आहे. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्याची हमी आहे. म्हणूनच जगात भारतीय लोकशाहीकडे आदराने पाहिले जाते. लोकशाहीतील नागरीक म्हणून देशाप्रती आपली जबाबदारी काय आहे हे सुध्दा प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे.
विकासाची प्रक्रिया लोकसहभागातून जास्त भक्कम होत असते. ज्या ठिकाणी लोकांचा सहभाग या प्रक्रियेत जास्त असतो तेथील विकास प्रक्रिया जास्त भक्कम असते. राज्यातील महाविकास आघाडी शासन या विकास प्रक्रियेला मजबुती देत आहे. नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून हाच विकासाचा हेतू आम्ही प्राधान्याने जपलेला आहे. प्रत्येक तालुक्यात वेगवेगळी नैसर्गिक आव्हाने आली. त्या सर्वांना आम्ही समर्थपणे सामोरे गेलो. कुठे पाण्याची टंचाई तर इतर अनेक प्रसंगांना आम्ही सामोरे गेलो. जलमित्र डॉ.शंकरराव चव्हाण यांनी जायकवाडी ते बाभळीपर्यंत अनेक प्रकल्प तयार करून पाण्याच्या प्रश्नाला उत्तर दिले. त्यातूनच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यानंतर सुध्दा नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या पायाभुत सुविधा भक्कमपणे उभ्या करण्यात आल्या. माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला. त्यातूनच शेतकऱ्यांबद्दलची क्रांती घडत गेली. शेतकऱ्यांचा विचार करून राज्य शासनाने कृषी पंप वीज ग्राहकांना तात्काळ विज जोडणी देवून त्यावर काम केले. विज बिलामध्ये 66 टक्केपर्यंतची रक्कम माफ करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांचे वीज बिल कोरे करण्याचा शासनाचा मानस आहे. 46.39 कोटी रुपये वीज भरणा शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्यात केलेला आहे. नवीन वीज केंद्रासाठी 15 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.
कोरोनाच्या काळात झालेल्या त्रासाला आम्ही सर्वांनी पाहिले आहे. त्यातून आरोग्यावर भर देणे शिकलो आहोत. नागरीकांच्या आरोग्यासाठी कोणतीही कमरता पडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. पिण्याचे पाणी आरोग्य सोयी यावर जास्त भर देत आहोत. गाव तेथे स्मशानभुमी या योजनेवर सुध्दा काम करत आहोत. आरोग्याच्या दृष्टीने सरकारी रुग्णालयात नवीन इमारतमध्ये अत्याधुनिक कोविड वार्ड तयार केला आहे. जिल्ह्याती प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशिल आहोत. प्रत्येक तालुक्यात एक्सरे मशीन उपलब्ध केली जात आहे. सोनोग्राफी सेंटर तयार केले जात आहे. समृध्दी महामार्गामुळे नांदेड जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यांमा मोठा फायदा होणार आहे. याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आम्ही सांगितल्यामुळे त्यांनी त्यास मंजुरी दिली आणि येत्या दोन वर्षात समृध्दी महामार्गाचे काम पुर्ण करण्याचा मानस आहे.
शहरात ज्या ठिकाणी पाणी मिळत नाही त्या ठिकाणी पाण्याची सोय केली जात आहे. त्यासाठी 20 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावीत आहे. नांदेड जिल्ह्याच्या जनतेसाठी काय-काय सुविधा देता येवू शकतात. त्यासाठी मी स्वत: जातीने लक्ष देवून काम करत आहे. अशा पध्दतीने पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याच्या विकास योजनांवर बोलत भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना पुन्हा एकदा शुभकामना दिल्या.
याप्रसंगी आ. मोहन हंबर्डे, आ.बालाजी कल्याणकर, आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर जयश्री पावडे, किशोर स्वामी, पोलीस उपअधिक्षक अर्चिना पाटील, डॉ.सिध्देश्र्वर भोरेअ, अनेक नगरसेवक, नागरीक, शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील पोलीस उपनिरिक्षक मिर्झा अनवर बेग मिर्झा इब्राहिम बेग यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाले आहे. आज भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देवून मिर्झा अनवर बेग यांचा सन्मान केेला.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.