विशेष

नांदेड आणि नाशिक जिल्ह्यातील न्यायालय कामाकाजासाठी नवीन एसओपी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड आणि नाशिक जिल्ह्यासाठी एका विहित पध्दतीनुसार कामकाज सुरू करण्याचे आदेश आल्यानंतर आज न्यायालयात सर्वसामान्य माणसाला जाण्या-येण्यास बंदी घालण्यात आली. हे आदेश उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एम.डब्ल्यू. चंदवाणी यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत. 25 ते 28 जानेवारीपर्यंत हे आदेश लागू आहेत. ज्याद्वारे अत्यावश्यक कामे दोन विविध पाळयांमध्ये न्यायालयात होणार आहेत.
महाप्रबंधक एम.डब्ल्यू चंदवाणी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार राज्याचे मुख्य न्यायमुर्ती आणि प्रशासकीय समितीचे इतर न्यायमुर्ती यांनी कोविड-19 च्या घटनाक्रमाला पाहुन नांदेड आणि नाशिक जिल्ह्यांसाठी न्यायालयीन कामकाजामध्ये नवीन एसओपी जारी केली आहे. यानुसार सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 2 ते 4 अशा दोन पाळ्यांमध्ये न्यायालयाचे कामकाज होईल. कार्यालयाची काम करण्याची वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 अशी आहे. या दरम्यान 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहिल.
न्यायालय पुरावा, युक्तीवाद घेतांना तांत्रिक सहाय घेईल. जे प्रकरण मिटवले जातील. त्याबद्दल न्यायालय पक्षकारांना समोर बोलावून काम करेल. दिवसाच्या पहिल्या पाळीमध्ये पुरावे घेतले जातील आणि दुसऱ्या पाळीमध्ये ज्या प्रकरणात निकाल द्यायचा आहे, कांही आदेश करायचे आहेत अशी कामे केली जातील. या परिस्थितीत न्यायालयीन अधिकारी वकील, पक्षकार, साक्षीदार आणि आरोपी यांच्या गैरहजेरीबाबत कांही आदेश करणार नाहीत. जे आरोपी तुरूंगात आहेत त्यांची हजेरी व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे घेतली जाईल.
न्यायालयात येणारा प्रत्येक व्यक्ती मास्क वापरेल, शारेरीक अंतर राखेल ज्या व्यक्तीला कोविड-19 ची लागन असेल त्याला न्यायालयीन परिसरात येण्यास बंदी असेल. न्यायालयीन सुरक्षेबद्दल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आपल्या सहकारी न्यायाधीशांसोबत दररोज सुरक्षा आढावा घेतील. हे आदेश 24 जानेवारी 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत आणि 28 जानेवारीपर्यंत या आदेशाची मुदत लिहिलेली आहे.
या आदेशामुळे आज सकाळपासूनच न्यायालयात सर्वसामान्य माणसाला जाण्यासाठी बंदी करण्यात आली. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकी आणि चार चाकी गाड्यांनी वाहनतळ केल्यामुळे रस्त्यावर वेगळीच कोंडी तयार झाली. कोणाला न्यायालयात जायचे असेल तर त्यांच्या वकीलाने गेटवर येवून सुरक्षा रक्षकांना सांगून त्या माणसाला आत घेवून जावे लागत होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *