क्राईम

शेतात महिलेचे गंठण लुटले; नांदेड ग्रामीण परिसरातून दोन दुचाकी चोरी; लिंबोटी शिवारातनू दोन बैल जोडीची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-पाळज ता.भोकर शिवारात शेतात काम करणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे गंठण बळजबरीने चोरण्यात आले आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. माळाकोळी जवळील लिंबोटी शिवारातून दोन बैल जोड्या चोरीला गेल्या आहेत.
किनी ता.भोकर येथील सुनिताबाई सत्यनारायण रेड्डी करेमवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 जानेवारीच्या सायंकाळी 4 वाजता मौजे पाळज ता.भोकर येथे त्या शेतात काम करत असतांना त्यांच्या शेतात बळजबरी येवून त्यांना धक्काबुक्की करुन त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे गंठण दरोडेखोरांनी चोरले. त्याची किंमत 70 हजार रुपये आहे. भोकर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 12 जानेवारी ते 13 जानेवारीच्या रात्री चोरी केलेल्या दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.डब्ल्यू 9318 ही 16 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडीचा गुन्हा 23 जानेवारी रोजी रात्री दाखल करण्यात आला आहे. या गाडीचे मालक मोहम्मद फारूख मोहम्मद याकुब आहेत. दुसऱ्या एका घटनेत 20-21 जानेवारीच्या रात्री विरभद्रनगर कौठा येथून ओमकार केरबा हलबांडगे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.पी.5972 ही 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस अंमलदार सुर्यवंशी यांच्याकडे देण्यात आला आहे.
लिंबोटी शिवारात भारत संभाजी जानकर हे 23 जानेवारी रोजी रात्री 12.30 ते 1 वाजेदरम्यान झोपले असतांना रात्री त्यांच्या आखाड्यावरील कुत्रा जोरजोरात भुंकत होता. उठून पाहिले असता दोन बैल जोडू किंमत 80 हजार रुपयांची जनावरे कोणी तरी चोरून नेली आहेत. माळाकोळी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार तेलंगे अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.