नांदेड(प्रतिनिधी) -स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने लोहा येथून चोरीला गेलेल्या एका मोबाईलचा शोध लावला असून तीन आरोपींना पकडून लोहा पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांनी पोलीस ठाणे लोहा येथे दिलेल्या अहवालानुसार त्यांना प्रल्हाद विठ्ठलराव व्यवहारे रा.भेंडेगाव जि.हिंगोली याची चौकशी केली असता त्याच्याकडे लोहा येथील गुन्हा क्रमांक 176/2020 मध्ये चोरी गेलेला मोबाईल सापडला या मोबाईलची किंमत 10 हजार रुपये आहे. हा मोबाईल आणि त्याचा सविस्तर शोध घेण्यासाठी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार गणेश धुमाळ, विलास कदम हे त्या मोबाईलच्या सविस्तर शोधासाठी निघाले. प्रसाद व्यवहारेने हा मोबाईल सुनिल संजय खिल्लारे (24), रा.म्हतारगाव ता.वसमत जि.हिंगोली आणि आकाश बालाजी डोईजड (26) रा.वसमत यांच्यामार्फत आणलेला होता. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने चोरीचा मोबाईल आणि तीन आरोपी लोहा पोलीसांच्या स्वाधीन केले आहेत आणि पुढील तपास करण्यासाठी विनंती केली आहे.