क्राईम

धर्माबाद रेल्वे स्थानकावर निमर्नुष्य ठिकाणी अत्याचार करून लुट ; दोघांना 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-21 जानेवारी रोजी रात्री धर्माबाच्या रेल्वे स्थानकावर एका महिलेला निमर्नुष्य ठिकाणी नेवून तिच्यावर बलात्कार करून तिचे सोन्याचे गंठण व मोबाईल लुटणाऱ्या दोन चोरट्यांना लोहमार्ग नांदेड पोलीसांनी त्वरीतच जेरबंद केले. आज या दोन अत्याचार करणाऱ्या लुटणारूंना लोहमार्ग न्यायालयाचे न्यायाधीश जोशी 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी पाठविले आहे.
21 जानेवारी रोजी धर्माबादच्या रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 2 वर एक महिला थांबलेली होती. त्यावेळी दोन जण तेथे आले आणि अंधार तसेच कमी गर्दीच्या आधारावर त्या महिलेल्या निरमनुष्य ठिकाणी नेले. तिच्यावर दोघांनी बलात्कार करून तिचा गळ्यातील 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण बळजबरीने चोरले. महिला त्यानंतर लोहमार्ग पोलीसांनाकडे आली आणि घडलेली हकीकत सांगितली.
लोहमार्गचे पोलीस निरिक्षक सुरेश उनवणे सध्या कोविडग्रस्त असतांना सुध्दा आपल्या कर्तव्याला प्राथमिकता देत तपासचक्रे फिरवली आणि त्वरीत प्रभावाने अक्षय धोंडिबा क्षीरसागर, भिमराव बाबुराव सरजे अशा दोन जणांना ताब्यात घेतले. लोहमार्ग औरंगाबादच्या पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील नांदेडला आल्या आहेत. त्यांनी घटनास्थळी जावून पाहणीपण केली आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अत्याचार आणि लुट प्रकरणाचा गुन्हा तपास करण्याची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरिक्षक बोईने मॅडमकडे देण्यात आला. आज दि.22 जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस निरिक्षक बोईने आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी पकडलेल्या लुटारू आणि अत्याचाऱ्यांना औरंगाबाद येथील लोहमार्ग न्यायालयात नेले होते. लोहमार्ग न्यायालयाचे न्यायाधीश जोशी यांनी या दोघांना 27 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.