नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने 21 जानेवारी 2022 रोजी परिपत्रक निर्गमीत केले आहे. या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच ध्वजारोहण कार्यक्रम व्यवस्थितरित्या व कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार कार्यक्रम पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
