क्राईम

वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीच्या दोन चार चाकी गाड्या पकडल्या  

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका आरोपीला पकडून त्याने चोरलेली दोन चार चाकी वाहने जप्त केली आहेत. पुढील तपासासाठी हा आरोपी दोन चारचाकी वाहनांसह भाग्यनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
दि.19 जानेवारी 2022 रोजी वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लूरोड, व्यंकट गंगुलवार, शेख इमरान यांनी खडकपुरा रस्त्यावर उभ्या असलेल्या एका गाडीची चौकशी केली. तेंव्हा त्यातील कार चालक पळून जावू लागला. पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याचे नाव यश उर्फ पिल्लू गौतम जोंधळे (20) रा. गणेशनगर रोड वायपॉईंट, क्रांतीनगर असे आहे. त्याच्याकडे असलेली कार त्याने आणि त्याचा मित्र अजय उर्फ सोनु कांबळे रा.वसरणी या दोघांनी चोरली असल्याचे सांगितले. सोबतच एक महिन्यापुर्वी फरांदेनगर येथून दुसरी एक कार चोरली होती. ती बाफना रेल्वे उड्डाण पुलाजवळ ठेवली असल्याची माहिती दिली. वजिराबाद पोलीसांनी पकडलेल्या दोन चार चाकी गाड्यांमध्ये एका गाडीवर एम.एच.26 व्ही.3435 असा क्रमांक दिसतो. दुसर्‍या चार चाकी वाहनावर एम.एच.२३ ई.३९९१ असा नंबर लिहिलेला आहे. पकडलेला चोरटा आणि जप्त केलेल्या दोन चार चाकी गाड्या वजिराबाद पोलीसांनी भाग्यनगर पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत. भाग्यनगर येथे या दोन कार संदर्भाने गुन्हा क्रमांक 429/2021 आणि 24/2022 असे दाखल आहेत.पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी वजिराबाद पोलिसांचे कौतुक केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *