नांदेड

विहिंप बजरंग दलाची बदनामी करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाही करावी – विहिंप बजरंग दल 

नांदेड,(प्रतिनिधी)- शहरात शांतीनगर येथे झालेल्या घटनेवरून विहिंप बजरंग दलाचे जाणीवपूर्वक नाव माध्यमात घेऊन सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर त्वरित कारवाही करावी अशी मागणी विहिंप बजरंग दल यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे केले आहे.
     विश्व हिंदू परिषद व बजरंग दल सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व समाजात सेवा करणारे संघटन असून अश्या संघटनेची अनाहूतपणे बदनामी करण्याचे कृत्य पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) ही संघटना करीत असून शांतीनगर येथे झालेल्या घटनेत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे नाव घेऊन सामाजिक तेढ निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहे, त्याचबरोबर अनेक माध्यमांद्वारे कोणताही पुरावा नसताना संघटनेचे नाव शांतीनगर येथील घडलेल्या घटनेशी जोडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांवर प्रशासनाने कठोर कारवाही करावी अन्यथा विहिंप बजरंग दलाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला असून यावेळी विहिंप प्रांत धर्मप्रसार प्रमुख कृष्णाजी देशमुख,जिल्हामंत्री शशिकांत पाटील,जिल्हा कोषप्रमुख गणेश महाजन,शहरअध्यक्ष रविकुमार चटलावार,महानगर मंत्री गणेश कोकुलवार,जिल्हा सहसंयोजक महेश देबडवार,शहर संयोजक कृष्णा इंगळे आदी उपस्थित होते.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *