नांदेड(प्रतिनिधी)-भोकर येथे पेालीस अंमलदार रघुनाथ दिगंबरराव वानखेडे यावर 14 हजारांची लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला. त्याला अटक झाली आणि त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. रघुनाथ वानखेडेने अगोदर स्थानिक गुन्हा शाखेत काम केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध कारभार करणाऱ्या मंडळीशी त्याचे चांगलेच ओळखीचे संबंध आहेत. या प्रकरणातील बिल्डींग मटेरियल सप्लायर हा मुळ राहणार वसमतचा आहे. म्हणजे नांदेड जिल्ह्यात बिल्डींग मटेरियल सपाय करण्यासाठी वसमत येथून माणसे येतात. ते आपल्या अवैध कारभाराला नांदेडमध्ये हवा देतात हे यानिमित्ताने समोर आले आहे.
दि.5 जानेवारी रोजी अमरावती येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भोकर येथील पोलीस अंमलदार रघुनाथ दिगंबरराव वानखेडे (57) बकल नंबर 1767 याने तीन हजार रुपये लाच स्विकारली आणि पुन्हा 14 हजार रुपये लाच मागितली. त्यात एक हजार रुपये त्याचे आणि 13 हजार रुपये साहेबांचे असा घटनाक्रम लाच पडताळणीमध्ये समोर आला. पण त्याने लाच त्या दिवशी स्विकारली नाही. तेंव्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संपुर्ण तपासणी करून 17 जानेवारी रोजी भोकर पोलीस ठाण्यात या संबंधाचा लाच मागणीचा गुन्हा दाखल करून रघुनाथ दिगंबर वानखेडेला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवून दिले आहे.
लाच मागणीच्या पडताळणीत 13 हजार रुपये मागणारा साहेब कोण हा महत्वाचा विषय आहे. त्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. भोकर येथील पोलीसंाचा सर्वात मोठा साहेब अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे हे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भोकरचे पोलीस उपअधिक्षक गोपाळ रांजनकर हे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर भोकरचे पोलीस निरिक्षक विकास पाटील आहेत. अपर पोलीस अधिक्षक कार्यालयातील वाचक अधिकारी, उपअधिक्षक कार्यालयातील वाचक अधिकारी तसेच भोकर पोलीस ठाण्यात असलेले इतर सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक हे सवृ रघुनाथ वानखेडेचे साहेब आहेत. हा साहेब लोकांचा हिशोब भोकरशी मर्यादीत आहे. जिल्ह्याचा हिशोब लावला तर ही संख्या लिहिण्याच्या पलिकडे जाईल.
पोलीस निरिक्षक विकास पाटील सुट्टीवर आहेत. त्यांनी आपल्या एका नियोजित कार्यक्रमानुसार ही सुट्टी घेतलेली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार ते सोमवार दि.23 जानेवारी रोजी परत आपल्या कामावर हजर होणार आहेत. पण त्यांच्या सुट्टीवर जाण्याची चिंता अनेकांना पडली आहे. भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांही अवैध कारभार सुरू असतील तर त्याचा जबाबदार एकटा विकास पाटील साहेब असतो काय? त्यांच्या पेक्षा मोठे असलेले इतर अधिकारी त्यास जबाबदार नसतात काय? हा प्रश्न या फुकटच्या कवीत्वातून मांडलेल्या शब्दसंग्रहात का दडवला गेला हे न समजणारे कोडे आहे. हे कवित्व लिहिणाऱ्यांना विकास पाटील प्रतिसाद देत नसतील हा एक अर्थ त्यात दडलेला असेल.
लाच मागणी करणारे पोलीस अंमलदार हे अगोदर स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत होते. तेथे त्यांना दुरभाष यंत्र (वायरलेस) ड्युटी करावी लागत आहे. त्यातील हा दु:खाचा प्रकार असेल तसेच ज्या बिल्डींग मटेरियल सप्लायरकडून लाचेची मागणी झाली तो राहणारा वसमत येथील आहे. याचा अर्थ भोकर जवळ असेलेले उमरी, मुदखेड, बारड, नांदेड येथे बिल्डींग मटेरियल सप्लायर्स यांनी काम धंदा सोडून दिला की काय अशी शंका यात येत आहे. ज्या माणसाची ही गाडी आहे त्या माणसाचे रघुनाथ वानखेडेशी गोड संबंध आहेत असेही सांगितले जात आहे. पण दुसऱ्यासाठी गार खोदता खोदता आपलीच गार तयार झाली हे रघुनाथ वानखेडला कळलेच नाही.
