विशेष

न्यायालयात आरोपीने केली नांदेड ग्रामीण पोलीस निरिक्षकाची तक्रार

एका लुट प्रकरणातील सहा आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-18 सप्टेंबर रोजी घडलेल्या एका लुट प्रकरणात नांदेड ग्रमाीण पोलीसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात आज सात पैकी एका आरोपीने पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांडे साहेब यांच्याविरुध्द मारहाणीची तक्रार केली आहे. या प्रकरणातील इतर सहा जणांना अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.बी.देशमुख यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे आणि तक्रार करणाऱ्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.
दि.18 सप्टेंबर रोजी वहाब मुल्ला यांच्या घरासमोर रात्री 3 वाजता गप्पा मारणाऱ्या मोहम्मद इमरान मोहम्मद गौस याला कांही लोकांनी लुटल्याचा गुन्हा 19 सप्टेंबरच्या रात्री दाखल झाला. त्या गुन्ह्याचा क्रमांक 665/2021 आहे. या गुन्ह्यात नाव असलेल्या वहाब मुल्ला यांचे काय कामकाज आहे हे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माहित आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलीसांनी मागेच पकडले होते. त्याच्याकडून लुटलेल्या 25 हजारांपैकी 10 हजार रुपये जप्त करण्यात आले होते.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने सोनु कल्याणकरवर झालेल्या हल्यात पकडलेल्या सर्व आरोपींना नांदेड ग्रामीण पोलीसांनी हस्तांतरण वॉरंटवर काल दि.18 जानेवारी रोजी तुरूंगातून आपल्या ताब्यात घेतले आणि गुन्हा क्रमांक 665 मध्ये अटक दाखवली. आज पोलीस निरिक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी बलप्रितसिंघ उर्फ आशिष नानकसिंघ सपुरे (24), प्रितेश बापूराव परघने(26), अफजल मुसा खान (33), शुभम चिताराम चव्हाण(29), रोहित मारोती इंगळे (21), सुमित अशोक एमले(20), दिनेश उर्फ निप्स मनोहर जमदाडे (25) या सात जणांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करतांना श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांनी फक्त आशिष सपुरेवरच बोलले इतर आरोपींबद्दल सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असे एकच वाक्य सांगितले. या प्रकरणात आरोपींच्यावतीने ऍड. मनप्रीतसिंघ ग्रंथी, ऍड. नितीन सोनकांबळे, ऍड. नयुम खान पठाण आदींनी वेगवेगळे युक्तीवाद केले.
पोलीसांबद्दल तक्रार आहे का ? अशी विचारणा न्यायालयाने केल्यानंतर बलप्रितसिंघ उर्फ आशिष सपुरेने तक्रार आहे असे सांगितले. या न्यायालयात महिला न्यायाधीश आहेत. म्हणून आपल्या स्वत:च्या कक्षात आपल्या न्यायालयातील एका पुरूष कर्मचाऱ्याला आशिष सपुरेचे निरिक्षण करण्यास सांगितले. त्यावेळी श्री अशोकरावजी घोरबांड साहेब सुध्दा त्या कक्षात गेले आणि असे घडल्याबरोबर ऍड.मनबिरसिंघ ग्रंथी यांनी याबाबतची तक्रार न्यायालयासमक्ष केली. त्यानंतर न्यायालयाने आशिषचा जबाब नोंदवला तेंव्हा आशिष सपुरे म्हणाला मला काल दि.18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्यासुमारास तुरूंगातून नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक माणिक हंबर्डे यांनी ताब्यात घेतले. त्यांनी माझी वैद्यकीय चाचणी केली आणि त्यानंतर पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे घेवून गेले. रात्री 8 वाजेच्यासुमारास पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब, सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे साहेब आणि दोन अनोळखी पोलीस ज्यांची नावे मला माहित नाहीत अशा चार जणांनी मला मारहाण केली. मारहाण लाकूड आणि सुंद्री(एकप्रकारचा पट्टा) याने मारहाण झाल्याचे सांगितले.मारहाण करतांना माझे पाय दोरीने बांधून उलटे लटकविण्यात आले आणि मग मारहाण केली. मारहाण केल्यानंतर मला पोलीस ठाण्याच्या बाहेर आणून सांगितले की, तु आता पळ आम्ही तुला गोळी मारतो, न्यायालयाने त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्यानंतर आशिष सपुरेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले आहे. सर्वसामान्य पणे दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या लोकांनी अशी तक्रार करणाऱ्याला वैद्यकीय चाचणीसाठी न्यायचे असते. पण नांदेड ग्रामीण पोलीसांनाच आशिष सपुरेला वैद्यकीय चाचणीसाठी घेवून जाण्यास सांगितले आहे. त्याची वैद्यकीय चाचणी आल्यावर त्या संबंधाच्या पोलीस कोठडीबद्दल विचारणा होईल अशी माहिती ऍड. मनप्रीतसिंघ ग्रंथी यांनी सांगितली.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *