नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील नागरीकांना 20 आणि 21 जानेवारी रोजी पाणी पुरवठा होणार नाही असे पत्र करीता असे लिहुन अतिरिक्त आयुक्तांच्या पदाखाली आपले नाव न लिहिता महानगरपालिकेने आदेश जारी केला आहे.
करीता असे लिहुन स्वाक्षरी करतांना आवश्यक असेल तरच असे करावे आणि असे करत असतांना स्वाक्षरी करणाऱ्याने आपले नाव व पद लिहावे असे शासनाचे परिपत्रक असतांना सुध्दा अतिरिक्त आयुक्त पदावर कोणीतरी करीता लिहुन स्वाक्षरी केली आहे. या आदेशानुसार कोटीतिर्थ पंपगृहात नवीन पंप बसविण्याचे काम सुरू आहे. तसेच मुख्य जलवाहिनीवर एअर वॉल्व बसविणे हे काम सुरू आहे आणि मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे दि.20 आणि 21 जानेवारी रोजी कोटीतिर्थ पंपगृहातून होणारा कच्चा पाण्याचा पुरवठा काबरानगर व डंकीन जलशुध्दीकरण केंद्रास होणार नाही. त्यामुळे या दोन केंद्रांवरून होणारा शुध्द पाणी पुरवठा दोनदिवशी होणार नाही. तरी नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
