नांदेड(प्रतिनिधी)-सन 2019 मध्ये आपल्या भावाचा मृत्यू डॉ.हनुमंत धर्माकारे े यांच्या हलगर्जी पणाने झाला हा निर्णय मनात धरुन त्या माणसाच्या मृत्यूचा बदला डॉ.हनुमंत धर्माकारेला मृत्यू दंडाची शिक्षा देवून मारेकऱ्यांनी जाहिर केलेला हा कृती समाज अत्यंत धोकादायक परिस्थितीकडे जात असल्याचे एक उदाहरण आहे.
दि.19 जानेवारी रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 5 या दरम्यान उमरखेड येथील उत्तरवार फुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत संताराम धर्माकारे यांच्या उमरखेड पुसूद रस्त्यावरील साखळी महाविद्यालयासमोर एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून खून केला. यवतमाळ पोलीसांनी आपल्या जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना या घटनेचा शोध लावण्यासाठी नियुक्त केले. यवतमाळ पोलीसांना 48 तासातच यश आले आणि त्यांनी ढाणकी ता.उमरखेड येथील चार जणांना ताब्यात घेतले. पोलीसांसमोर सर्वात मोठे आवाहन असे होते की, डॉ.धर्माकारेचा खून का झाला? त्यात पोलीसांनी डॉ.धर्माकारे यांच्या जिवनातील प्रत्येक बाबीकडे आपले लक्ष केंद्रीत केले. आणि सुतावरुन स्वर्ग गाठतात तेच खरे पोलीस असतात. त्यानुसार त्यांनी सय्यद तोफीक सय्यद खलील, सय्यद मुस्ताक सय्यद खलील, शेख मोहसीन शेख कयुम, शेख शाहरुख शेख आलम अशा चार जणांना ताब्यात घेतले. या घटनेचा मारेकरी मात्र अद्याप सापडलेले नाही. त्याचे नाव शेख एफान शेख अनार (22) असे आहे.अब्रारने डॉ.धर्माकारेंचा खून करून पळून जाण्यासाठी वापरलेली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.04 डी.एन.6263 जप्त केली आहे.
पोलीसांनी शोधलेल्या डॉ.धर्माकारेच्या खूनाचे कारण आपले बोट आश्चर्याने तोंडात टाकण्यासारखे आहे. दि.4 जून 2019 रोजी रात्री 2 वाजता उमरखेड शहरातील एका चौकात दुचाकी गाडीचा अपघात होवून शेख एफान शेख अनारचा भाऊ शेख अरबाज शेख अनार हा जखमी झाला. त्याबाबत उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 196/2019 भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 304 (अ) नुसार दाखल आहे. त्यावेळी जखमी अवस्थेत शेख अरबाजला उमरखेड येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. पण दुर्देवाने शेख अरबाजचा मृत्यू झाला. त्यावेळी अरबाजचा लहान भाऊ शेख एफान शेख अनार याने आणि त्याच्या नातेवाईकांनी त्यावेळी जखमी शेख अरबाजचा प्राथमिक उपचार करण्यासाठी शासकीय ड्युटीवर असलेल्या डॉ.हनुुमंत धर्माकारे यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. आणि त्याचा परिणाम जवळपास 3 वर्षानंतर 19 जानेवारी 2022 रोजी समोर आला आणि शेख एफान शेख अनार याने डॉ.हनुमंत धर्माकारेचा गोळ्या घालून खून केला.
खरे तर शेख अरबाजच्या मृत्यूसाठी जबाबदार तो वाहन चालक आहे ज्याने त्याला 2019 मध्ये धडक दिली असेल. किंवा शेख अरबाज स्वत: जबाबदार आहे. ज्यामुळे तो अपघात घडला आणि शेख अरबाज जखमी झाला. पण गुन्हा क्रमंाक 196/2019 मध्ये खरे काय घडले होते. त्याचा प्रथम खबरी अहवाल वाचण्यासाठी प्राप्त झाला नाही. म्हणून त्यातील सत्यता लिहिला आली नाही. दुर्देवाने त्या दिवशी डॉ.हनुमंत धर्माकारे यांची ड्युटी असणे हे त्यांच्यासाठी घातक ठरले. शेख एफान शेख अनार आणि त्यांच्या नातलगांनी सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे हे जजमेंट दिले की, शेख अरबाजच्या मृत्यूसाठी डॉ.धर्माकारेचा हलगर्जीपणा जबाबदार आहे आणि त्या जजमेंटनुसार या अक्कल नसलेल्या लोकांनी डॉ.हनुमंत धर्माकारेला मृत्यूदंड देवून टाकला.
डॉ.हनुमंत धर्माकारे यांच्या हलगर्जीपणामुळे शेख अरबाजचा मृत्यू झाला असेल तर त्यासाठी एक सक्षम यंत्रणा आहे. ज्यांच्याकडे जावून डॉ.धर्माकारेच्या हलगर्जीपणाबद्दल तक्रार करता आली असती. ती तक्रार सिध्द करतांना त्या सक्षम यंत्रणेकडे पुरावे सादर करण्यात आले असते तर डॉ.धर्माकारे यांच्या वैद्यकीय व्यवसायाची नोंदणी रद्द झाली असती. पण शेख कुटूंबियांनी स्वत:च सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होवून डॉ.धर्माकारेला त्यांच्या भाषेतील, त्यांच्या निर्णयातील मृत्यूदंड देवून टाकला. हा घडलेला प्रकार असाच आहे तर त्यातून समाजामध्ये एक दुर्देवी संदेश जात आहे. कमी शिकलेली व्यक्ती आणि स्वत: निर्णय घेण्याची क्षमता स्वत:मध्ये नसल्यामुळे या मुर्खांनी डॉ.धर्माकारेंचा खून केला आहे.
डॉ.हनुमंत धर्माकारे हे जवळपास 10 वर्षापासून उमरखेडमध्ये राहत आहेत. नांदेडमध्ये जन्मलेले डॉ.धर्माकारे यांचे मुळ गाव बोरगाव थडी ता.बिलोली हे आहे. त्यांचे वडील एस.टी.महामंडळाच्या वाहक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. डॉ.धर्माकारेंचा एक भाऊ आणि एक बहिणी डॉक्टर आहेत. डॉ.धर्माकारेंची पत्नी डॉक्टर आहे. एका चांगल्या कुटूंबाच्या सुंदर जीवनात या शेख कुटूूंबियांनी आपल्या मुर्खपणामुळे दगड टाकला आहे. डॉ.धर्माकारेंचा मृत्यू झाला म्हणजे त्यांची या जीवनातून मुक्ती झाली. शेख कुटूंबातील पाच जण आता तुरूंगात जातील अनेक लोकांसमक्ष घडलेल्या या खून प्रकारात सबळ पुरावा येईल आणि शेख कुटूंबियांना शिक्षा होईल असे आज तरी वाटते कारण डॉ.धर्माकारे यांना मानणारा एक मोठा वर्ग उमरखेडमध्ये आहे. त्यांनी आपल्या जीवनात पैसे कमावण्यासोबत सामाजिक सेवेला सुध्दा महत्व दिलेले आहे. याचा परिणाम कुठे तरी होईलच आणि शेख कुटूंबियांविरुध्द सबळ पुरावा येईलच अशी आजची अपेक्षा आहे.
डॉ.धर्माकारे यांच्या हलगर्जीपणामुळे शेख अरबाजचा मृत्यू झाला असा मुर्खपणाचा समज या शेख कुटूंबियांनी आपल्या मनात बाळगला आणि डॉ.धर्माकारेंना मृत्यू प्रदान केला. डॉ.धर्माकारेंचा मृत्यू अशाच पध्दतीने करण्याची समाजात संदेश जाणारी ही प्रक्रिया अत्यंत घातक आहे. कारण ज्या दवाखान्यांमध्ये तुम्हाला आत जाता येत नाही तेथे काय-काय प्रकार घडतात याची तर कल्पनाच समाजाला नाही. असाच डॉ.धर्माकारे सारखा मृत्यू मिळणार असेल तर समाजातील डॉ.मंडळी वैद्यकीय अधिकारी या पदावर नोकरी करणार नाहीत. डॉ.धर्माकारेने सन 2019 चा प्रकार विसरुन आपल्या कामाला पुन्हा सुरुवात केली होती आणि त्यांनी आपल्या जीवनात चांगलीच ख्याती मिळवली होती. यवतमाळ पोलीसांनी अत्यंत परिश्रम करून 48 तासात या खूनाचा उलगडा केला त्यांचेही कौतुक करायला हवे. आम्ही या जीवनात चांगलेच करण्यासाठी जन्मलो आहोत या विचारातून जगण्याची नक्कीच गरज आहे नाही तर डॉ.हनुमंत धर्माकारेंसारखे किती तरी वैद्यकीय अधिकारी शेख कुटूंबियांसारख्या मुर्ख निर्णयामध्ये बळी जातील.
