नांदेड

कोरोना केली ४२० गिरी; सोमवारी दिले ६४३ नवीन रुग्ण

नांदेड,(प्रतिनिधी)- आज सोमवारी कोरोना विषाणूने  एकूण ४२० नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २९६६ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९४.०३ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात ३३.५१ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ६८.०९ टक्के रुग्ण आहे.
                       जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर  यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक १७ जानेवारी रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज ४२० नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
                         नांदेड मनपा विलगिकरणातून-१६४, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०२, खाजगी रुग्णालय-०६,जिल्हा कोविड
रुग्णालय-०३,तालुक्यातील गृह विलगीकरण-२६,अश्या २०१ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८८५८४ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९४.०३ टक्के आहे.
             आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-२८६, मुखेड-०५, कंधार-०२, नांदेड ग्रामीण-४३, किनवट-२२, मुदखेड-०२, बिलोली-०२, अर्धापूर-०३, देगलूर-१०, लोहा-०२, नायगाव-०१,भोकर-०२,   हिमायतनगर-०१, उमरी-०२,धर्माबाद-१३, परभणी-०२,  हिंगोली-०३,  यवतमाळ-०१,उदगीर-०४,जयपूर-०१,हैद्राबाद-०१, मुंबई-०१, वर्धा-०१,असे आहेत.
                          आज १२५३ अहवालांमध्ये ७०० निगेटिव्ह आणि ४२० पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९४२०५ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ३८५ आणि ३५ अँटीजेन तपासणीत असे एकूण ४२० रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब १११ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब २२ आहेत.
                                आज कोरोनाचे २९६६ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -२३०९, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-६०१,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-२९, खाजगी रुग्णालयात- १७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-०७ असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०३ रुग्ण आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *