

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने गुजरात राज्यातून पकडून आणलेल्या दोन चोरट्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी सचिन पाटील यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.24 डिसेंबर रोजी सोमेश कॉलनी नांदेड येथून 6 लाख 50 हजार रुपयांची बॅग चोरून नेणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका वस्तीतून पकडून आणले. चोरलेल्या 6 लाख 50 हजार रुपयां मधील 3 लाख रुपये स्थानिक गुन्हा शाखेने त्यांच्याकडून जप्त केले आहेत.
या प्रकरणात पकडून आलेले सिसोद्दीया उर्फ मुन्ना जयसिंग राठोड आणि रवींद्र बच्चू इंद्रेकर या दोन चोरट्यांना पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार शंकर म्हैसनवाड, बालाजी तेलंग आणि गणेश धुमाळ यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. घडलेला सर्व प्रकार सविस्तर मांडून उर्वरीत 3 लाख रुपये रक्कम जप्त करणे आहे. यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश सचिन पाटील यांनी युक्तीवाद ऐकल्यावर या दोन्ही चोरांना दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या चोरट्यांनी अहमदाबाद ते नांदेड असा प्रवास दुचाकीवर करून ही चोरी केलेली आहे.तसेच तेबी परत सुद्धा दुचाकीवरच गुजराथ राज्यात गेले आहेत. पोलीसांनी ती दुचाकी सुध्दा जप्त केलेली आहे ती अद्याप नांदेडला पोहचलेली नाही.