क्राईम

भाग्यनगर पोलीसांनी पाच मोबाईल चोर पकडले त्यात दोन विधीसंघर्षग्रस्त बालक; तीन जणांना पोलीस कोठडी  

4 लाख 2 हजार 500 रुपयांचे 16 मोबाईल जप्त 
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस स्टेशन भाग्यनगरच्या गुन्हे शोध पथकाने पाच मोबाईल चोर पकडून त्यांच्याकडून 4 लाख 2 हजार 500 रुपये किंमतीचे एकूण 16 मोबाईल जप्त केले आहेत. 
              दि.13 जानेवारी रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संजय बाबूराव दिक्षीत हे सेवानिवृत्त व्यक्ती भाजीपाला खरेदी करत असतांना सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास त्यांच्या खिशातील 9 हजार रुपये किंमतीचा मोबाईल कोणी तरी लंपास केला. याबाबत त्यांनी त्वरीत पोलीसांना माहिती दिली. भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहायक  पोलीस निरिक्षक सुशांत किनगे, पोलीस अंमलदार संजय कळके, प्रदीप कर्दनमारे, हनंमता कदम, सुमेध पुंडगे आदींनी त्वरीत हालचाल करून शेख शोएब शेख उमर (20), शेख दिलबर शेख  नसीरोद्दीन (19) आणि शेख जियाद शेख मुजाहिद (26) सर्व रा.महाराजपूर जि.साहेबगंज राज्य झारखंड ह.मु.ताजबाग नागपूर या तिघांसह दोन अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना पकडले. त्यांच्या संशयीत हालचालीबद्दल माहिती विचारली असता ते समाधानकार उत्तर देत नव्हते. पोलीसांनी या प्रकरणी अखेर त्यांना बोलते केले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगची पंचासमक्ष तपासणी केली. त्यामध्ये 4 लाख 2 हजार 500 रुपये किंमतीचे 16 महागडे मोबाईल सापडले. 
                    या कार्यवाहीबद्दल पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृह पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील आदींनी भाग्यनगर पोलीसांचे कौतुक केले आहे.
                    पकडलेल्या तीन मोठ्या वयातील युवकांना गुन्हा क्रमांक 16/2022 मध्ये आज पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे, पोलीस अंमलदार धनंजय कुंभरवाड आणि ओमप्रकाश कवडे आदींनी न्यायालयात हजर केले. न्यायालयात या प्रकरणी जामीन  पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील  ऍड.गिरीश मोरे यांनी केल्यानंतर न्यायालयाने या तीन चोरट्यांना 18 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. 
 
चोरांसाठी वकिल तयार 
या पकडलेल्या तीन चोरट्यांना पोलीस कोठडी मागणीसाठी न्यायालयात हजर केले तर विधीसंघर्षग्रस्त या संज्ञेतील दोन जणांना बाल न्यायममंडळा समक्ष  हजर केले. न्यायालयात पोलीस कोठडी दरम्यान या तीन मोबाईल चोरट्यांसाठी नांदेड सोडून बाहेरचे वकिल मंडळी हजर होते. स्थानिक वकीलांना सोबत घेवून त्यांचे कामकाज सुरू होते. यावरून यदाकदा आपण पकडलो गेलो तर चोर आणि त्यांचे पाठीराखण करणारी मंडळी यांनी वकिलांचे पथक तयार ठेवल्याचे या घटनेवरून दिसते. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *