क्राईम

सोनु कल्याणकरवर हल्ला करणारा गोलु मंंगनाळे पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-आदर्श शिक्षीका पुरस्कार प्राप्त शिक्षकेचा मुलगा अनिकेतवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला भाग्यनगर पोलीसांनी पकडल्यानंतर अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.ए.खलाने यांनी त्यास 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले.
दि.11 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 8.30 वाजेच्यासुमारास अनिकेत उर्फ सोनु अशोकराव कल्याणकर हे आपल्या घरासमोरील कार्यालयात बसले असतांना अचानकपणे दोन जण आले आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी हल्लेखोरांनी पिस्तुलातून सोनु कल्याणकरवर गोळ्या झाडल्या पण सुदैवाने सोनु कल्याणकरला काही इजा झाली नाही. या प्रकरणाचा गुन्हा क्रमांक 268/2021 भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल होता. या प्रकरणाचा समांतर तपास करतांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या पथकाने बलप्रितसिंघ उर्फ आशीष नानकसिंघ सपुरे (24), प्रितेश बाबूराव परघणे(26), अफजल खान मुसा खान पठाण(33) एस.टी.महामंडळ मेकॅनीक, रोहित मारोतराव इंगळे(21), शुभम सिताराम चव्हाण (29) लिपीक एस.टी महामंडळ, सुमित अशोक एमले (20), दिनेश उर्फ निप्स मनोहर जमदाडे (25) रा.श्रीनगर नांदेड अशा सात जणांना पकडले. सध्या हे सात जण न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात आहेत.
या प्रकरणातील मुक्तेश्र्वर उर्फ गोलु चंद्रविजय मंगनाळे (24) रा.नाईकनगर ह.मु.पुणे हा युवक मात्र फरार होता. भाग्यनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल भोसले आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार संतोष वच्छेवार यांनी मुक्तेश्र्वर उर्फ गोलु मंगनाळेला काल पकडून आणले. आज या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस निरिक्षक सुधाकर आडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुक्तेश्र्वर उर्फ गोलु मंगनाळेला न्यायालयात हजर केले. न्यायालयात सरकारी वकील ऍड. गिरीश मोरे यांनी पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली. न्यायाधीश एस.ए.खलाने यांनी मुक्तेश्र्वर उर्फ गोलु चंद्रविजय मंगनाळे यास चार दिवस अर्थात 18 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. गोलु मंगनाळेवर यापुर्वी सुध्दा इतरांवर फायरींग करण्यासाठी दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यात त्याला अटकही झाली होती. तो जवळपास 11 महिने जेलमध्ये होता.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.