नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात सकाळी एक एस.टी.गाडी फोडल्यानंतर कटकारस्थान थांबले नाही. सायंकाळी पुन्हा विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयासमोर एका लालपरीवर दगडफेक करण्यात आली. यामुळे एस.टी.बसवर हल्ला करणार्यांना मुळापासून नष्ट करण्याची आवश्यकता ही घटना सांगते आहे.
आज सकाळी विष्णुपूरी भागात एका एस.टी.महामंडळाच्या गाडीवर दगडफेक झाली. गाडीचे १५ हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणी व्यक्ती जखमी झाला नव्हता. सायंकाळी ६ वाजता एम.एच.१४ बी.टी.१८२९ ही लालरंगाची एस.टी.महामंडळाची लालपरी नांदेडकडे येत असतांना त्यावर दगडफेक झाली आणि हल्लेखोर पळून गेले. विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयासमोर लालपरीवर हल्ला करून हल्लेखोरांनी दाखवलेली हिंमत नेस्तनाबुत करण्याची आवश्यकता आहे. १२ तासांच्या आत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एस.टी.महामंडळाच्या गाडीवर दगडफेक करण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. सर्वसामान्य माणूस या एस.टी.गाडीचा मालक आहे. त्यांनी सुध्दा असे होत असतांना हल्लेखोरांचा विरोध करणे आवश्यक आहे. तरच लालपरींवर होणारा हा हल्ला रोखता येईल.
