नांदेड

बेघर पत्रकारांच्या घोटाळ्यातील संचिकेत बोगस स्वाक्षऱ्या ?

नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांच्या संचिकेमध्ये सापडलेल्या दोन कागदांच्यज्ञा आधारावर एका माणसाच्या दोन वेगवेगळ्या माणसांनी स्वाक्षऱ्या केल्याचे दिसते आहे. या अर्थ या कागदपत्रांमध्ये बनावट पणाकरून महानगरपालिकेची जमीन लाटल्याचा प्रकार दिसत आहे.
बेघर पत्रकारांनी 1984 पासून आम्हाला निवारा मिळावा म्हणून महानगरपालिकेने जागा द्यावी असा अर्ज केला. यामध्ये बहुभाषिक पत्रकार गृहनिर्माण को.ऑपरेटीव्ह सहकारी सोसायटी आणि पत्रकार सहवास को.ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि.नांदेड अशा दोन वेगवेगळ्या संस्थांनी सुरू केलेला हा कट कारस्थानाचा प्रकार मजेशिर आहे.या प्रकरणात 14 नोव्हेंबर 2019 रोजी महानगरपालिकेने ताबा दिल्याची पावती सापडली. या पावतीवर ताबा घेणाऱ्याचे नाव श्री भगवानराव रामराव कुलकर्णी अध्यक्ष पत्रकार सहवास सोसायटी असे लिहिलेेले आहे. त्यावर स्वाक्षरी आहे. ती इंग्रजी अक्षराच्या बी पासून सुरू होते. त्यानंतर 18 सप्टेंबर 2000 रोजीचे एक महत्वाचे असे हेडींग लिहिलेले पत्र प्राप्त झाले. यामध्ये संस्थेच्या नावातील चुक दुरूस्त करण्याबाबतचा विषय आहे. त्यात आम्हाला जागेचा ताबा मिळाला असून आमच्या भाडेपट्टी करारावर मुदत वाढ दिली आहे. परंतू आपल्या ठरावात आणि कार्यालयीन दप्तरात आमच्या संस्थेच्या नावाची नोंद बहुभाषिक पत्रकार गृहनिर्माण को.ऑपरेटीव्ह सोसायटी अशी झाली आहे. जी चुकीची आहे. आमच्या संस्थेचे नोंदणीकृत नाव पत्रकार सहवास को.ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि.नांदेड असे आहे. त्यामुळे पुढील व्यवहार या नावाने करावा अशी विनंती मनपा आयुक्तांना करण्यात आली आहे. या अर्जावर सुध्दा भगवानराव कुलकर्णी अध्यक्ष असे लिहिलेले आहे. या पत्रावरील स्वाक्षरी के या इंग्रजी अक्षरापासून सुरू होते. दोन्ही स्वाक्षऱ्यांचा अभ्यास केला तर त्या-वेगवेगळ्या आहेत. हे सहजपणे दिसते. 18 सप्टेंबर 2000 चे पत्र हे हस्ताक्षरात लिहिलेले आहे. हे हस्ताक्षर पत्रकारांमध्ये अत्यंत प्रसिध्द हस्ताक्षर आहे.
या दोन्ह पत्रांच्या संदर्भाने नांदेड येथील काही विधीज्ञांचे मार्गदर्शन घेतले असता स्वाक्षऱ्या पाहुन त्यांनी सुध्दा सांगितले की हा बनावटीचा प्रकार आहे, खोटे कागदपत्र तयार करून ते खरे आहेत असे भासवून त्यांचा वापर केलेला आहे. या पत्रावरील हस्ताक्षर पाहिले असता या हस्ताक्षराची तपासणी पुन्हा एकदा होवून कोणी बनावट पणा केला आणि बेघर पत्रकारांसाठी सर्वसामान्य नागरीकांच्या मालकीची नांदेड येथील दोन एकर जमीन आपल्या घश्यात टाकली याचा शोध होण्याची गरज आहे.

बेघर पत्रकारांनी 10 टक्क्यांची घरेपण लाटलीत
बेघर पत्रकारांनी मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये शासनाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने दिली जाणारी घरे सुध्दा लाटलेली आहेत. तयार झालेल्या घरांच्या एकूण रक्कमेतील फक्त 10 टक्के रक्कमेत ही घरे देण्याचा अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो. तेथेही आपली कटोरी पसरून त्यात 10 टक्केचे घर पाडून घेतल्याचे प्रकार शोधले पाहिजेत म्हणजे खऱ्या अर्थाने बेघर पत्रकारांचे पितळ उघडे पडेल. पण हे करावे कोणी हा प्रश्नच आहे. त्यासाठी प्रशासनिक अधिकाऱ्यांची मानसिकता असावी लागते. नाहीतर कांही जणांच्या अर्जांवर प्रशासनिक अधिकारी एका क्षणात स्वाक्षरी करून ते पत्र कांही मिनिटात दुसऱ्या कार्यालयात पाठविण्यात आपली धन्यता मानतात आणि त्या पत्राच्या आधारावर अनेक जण समाजातील लोकांना छळतात असेही प्रकार घडलेले आहेत. तेंव्हा आज तरी देव पाहुन घेईल हे म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.