नांदेड

कालच्या मानाने पाऊण शतक कमी आले रुग्ण;तपासणी कमी झाली … आज ४०० रुग्ण;उपचार घेणारे रुग्ण १४३६;नांदेड शहरात एकूण रुग्णांच्या तुलनेत ६३.७५ टक्के  रुग्ण सापडलेत 

नांदेड,(प्रतिनिधी)- आज बुधवारी कोरोना विषाणूने  एकूण ४७४ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४३६ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९५.५६ झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात २४.७२ टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ६२.७५ टक्के रुग्ण आहे.
                       जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर  यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक १३ जानेवारी रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज ४०० नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
                         नांदेड मनपा विलगिकरणातून-५८, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०९,नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातून विलगीकरण-०२, खाजगी रुग्णालय-०२,जिल्हा कोविद रुग्णालय-०१,अश्या ७२ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८८०९८ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९५.५६ टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-२५१, मुखेड-०७, कंधार-०४, नांदेड ग्रामीण-२१, किनवट-०९, मुदखेड-२३, बिलोली-०५, उमरी-१२, अर्धापूर-०३, देगलूर-०३,हदगाव-०३, लोहा-०९,नायगाव-०१,हिमायतनगर-०१, धर्माबाद-२०,वाशीम-०१, परभणी-१०,बीड-०१,पुणे-०१, उत्तरप्रदेश-०२,मुंबई-०२,भोकर-०१, अकोला-०४, अमरावती-०१,जालना-०१,हिंगोली-०२,कोल्हापूर-०१, हैद्राबाद-०१,असे आहेत.
                          आज १६१८ अहवालांमध्ये ११७५ निगेटिव्ह आणि ४०० पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९२१८९ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ३४३ आणि ५७ अँटीजेन तपासणीत असे एकूण ४०० रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ३४ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०९ आहेत.
                                आज कोरोनाचे १४३६ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१०९१, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-२९१,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-२७, खाजगी रुग्णालयात- १५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-१२ असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०३ रुग्ण आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *