नांदेड(प्रतिनिधी)- माध्यमिक तथा पुर्व माध्यमिक परिक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत टायनी एंजल्स स्कुलने भरीव कामगिरी केली असून त्यांचे 16 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
पाचवी वर्गाच्या शिष्यवृत्ती परिक्षेत टायनी एंजल्स स्कुलचे राजदीप अभिजित देशमुख (जिल्ह्यात क्रमांक 26), सार्थक आशिष देशपांडे (175), श्रृत्ती संगमेश्र्वर चटनाळे(234) हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. आठव्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परिक्षेत कृष्णप्रिया शिवकुमार बाऱ्हाळीकर (4), अंगद विठ्ठोबा वैद्य(28), वैष्णवी देविदास जोशी (88), प्राजक्ता विजय गायकवाड (119), वैष्णवी अभजय देशपांडे (124), अनुज रमेश कोरके (125), केतकी राजेश सदावर्ते(163) हे विद्यार्थी यशस्वी झाले. इंग्रजी माध्यमातील पाचव्या वर्गाच्या स्कॉलरशिप परिक्षेत रागीणी सुशांत पांडे (202) ही विद्यार्थीनी यशस्वी झाली. इंग्रजी माध्यमातील आठव्या वर्गाच्या स्कॉलरशिप परिक्षेत कृष्णकांत महादेव केंद्रे (50) ऊर्जा शरद हंबर्डे (158), श्रावणी बळीराम निखाते (167) हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ.संध्या देवेंद्र जोशी यांच्यासह सचिव गिरीश डापणे, मुख्याध्यापक गंगाधर पोवाडे, नागोराव जोंधळे, मार्गदर्शक शिक्षक नाथराव मुंडे, हेमंत देशपांडे, सुजाता टेळकीकर, विशाल कदम, शिल्पा सुर्यतळ तसेच त्यांचे सहकारी मित्र आणि पालक यांनी कौतुक केले आहे.