

नांदेड,(प्रतिनिधी)- आज मंगळवारी कोरोना विषाणूने सुनामीच आणली आहे. एकूण ४७४ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ११०८ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९५.९० झाली आहे.एकूण तपासणीच्या तुलनेत जिल्ह्यात २३.५० टक्के रुग्ण सापडले आहेत.एकूण सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीत सापडलेले रुग्ण ७२.९९ टक्के रुग्ण आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक १२ जानेवारी रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज ४७४ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
नांदेड मनपा विलगिकरणातून-२९, सरकारी रुग्णालय विष्णुपुरी -०२,नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातून विलगीकरण-०३ खाजगी रुग्णालय-०१,अश्या ३५ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८८०२६ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९५.९० टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-३४६, मुखेड-१२, कंधार-१४, नांदेड ग्रामीण-२३, किनवट-०४, मुदखेड-०६ बिलोली-०६, उमरी-०१, अर्धापूर-०५, देगलूर-१०,हदगाव- ०५,लोहा-१७,नायगाव-०२,हिमा यतनगर-०१, वाशीम-०१, परभणी-०५,पुणे-०१,लातूर-०१, अहमदनगर-०१, अकोला-०२,अमरावती-०१,पंजाब-०१, हिंगोली-०७,उतराखंड-०१,असे आहेत.
आज २०१७ अहवालांमध्ये १४८५ निगेटिव्ह आणि ४७४ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९१७८९ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ४३५ आणि ३९ अँटीजेन तपासणीत असे एकूण ४७४ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल ०० प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ४५ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब १३ आहेत.
आज कोरोनाचे ११०८ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -८५३, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-२०५,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-२७, खाजगी रुग्णालयात- १०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-१३ असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०४ रुग्ण आहेत.