नांदेड

सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम रद्द

नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त 11 जानेवारी 2022 रोजी सामुहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु नांदेड जिल्ह्यात नवीन व्हेरिंएटचा शिरकाव झाला असून कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. या पाश्वभूमिवर जिल्हाप्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी  म्हणून सामुहिक राष्ट्रगान कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.याची सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच अशासकीय संस्था यांनी नोद घ्यावी असे जिल्हाप्रशानच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *