नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी 2 लाख 16 हजार रुपयांचे दागिणे चोरले आहेत. तसेच भोकर शहरात एक फर्निचरचे दुकान फोडून त्यातील 10 ते 12 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.
रेशमा बेगम सय्यद हारुन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इतवारा येथील बर्की चौक परिसरात दि.9 जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता ब्रिजमोहन ज्वेलर्स यांच्या दुकानासमोर एक सोन्याच्या हाराचे गंठण करून घेतले. त्यानंतर त्या ब्युटी पार्लरला गेल्या आणि तेथून घरी जात असतांना ऍटोमध्ये बसण्याअगोदर त्यांनी तपासणी केली असता त्यांच्या बॅगमध्ये दोन तोळे सोन्याचे नेकलेस, 60 हजार रुपये किंमतीचे व एक सोन्याचा हार किंमत 1 लाख 56 हजार रुपयांचा गायब होता. एकूण 2 लाख 16 हजार रुपयंाचा ऐवज कोणी तरी चोरला आहे. इतवारा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके अधिक तपास करीत आहेत.
सुहास खंडू पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 जानेवारी रोजी सकाळी ते 9 वाजता दुकान उघडण्यासाठी आले असतांना उमरी म्हैसा वळण, भोकर येथे असलेल्या त्यांच्या विश्र्वकर्मा फर्निचरचे दुकान तोडफोड करून त्यातील 10 ते 12 हजार रुपये रोख रक्कम कोणी तरी चोरट्यांनी काढून नेली आहे. भोकर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक बाचेवाड हे करीत आहेत.
