नांदेड

कधी काळी स्थानिक गुन्हा शाखेचा खास असणाऱ्या मुन्नाविरुध्द फसवणूकीचा गुन्हा

नांदेड(प्रतिनिधी)-दोन मुलांना नोकरी लावतो असे सांगून एकाने 4 लाख 50 हजार रुपये गंडवल्याचा प्रकार घडल्यानंतर हदगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पांडूरंग जयराम परसोडे हे उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून चालक या पदावरून सेवानिवृत्त झाले. तामसा येथील शेख मसरत उर्फ मुन्ना शेख मसलूम याने तुमच्या दोन्ही मुलांना नोकरी लावतो म्हणून त्यांच्याकडून 4 लाख 50 हजार रुपये घेवून त्यांना गंडवले. हा प्रकार 22 फेबु्रवारी 2015 ते 25 मे 2021 दरम्यान घडला. या काळातील कांही वेळेस  शेख मसरत उर्फ मुन्ना शेख मसलूम हा नांदेड जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेतील एक महत्वपूर्ण व्यक्ती होता. पुढे त्याच्यावर पोलीस अधिकाऱ्यांची नावे सांगून पैसे उकळल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. पण त्या प्रकरणात तो पोलीस अधिकारी कोण? या बाबत तपास पुर्ण झाला नाही.
पांडूरंग परसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हदगाव पोलीसांनी गुन्हा क्रमांक 10/2022 शेख मसरत उर्फ मुन्ना शेख मतलुम विरुध्द भारतीय दंड संहितेतील कलम 420 आणि 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक हणमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गोविंद खैरे हे करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *