महाराष्ट्र

पोलीस महासंचालक संजय पांडे यांना काढण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेचा कर्ताधनी कोण?

नांदेड(प्रतिनिधी)-राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना तात्पुरता प्रभार आहे या कारणासाठी त्यांना हटवावे म्हणून उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल झालेल्या रिट याचिका संदर्भाने एका वकीलाने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर बरीच ट्रोलिंग होत आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे हे आजच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील पोलीस दलात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आवडते व्यक्तीमत्व आहे. त्यांना काढून काय साध्य होणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
मुंबई उच्च न्यायालयात ऍड. दत्ता माने यांनी जनहित याचिका दाखल केली आहे की, युपीएसीने तीन पोलीस अधिकारी हेमंत नगराळे, के.व्यंकटेशम्‌ आणि रजनिश सेठ या तीन नावांची शिफारस पोलीस महासंचालक पदावर नेमण्यासाठी केली असतांना तात्पुरता प्रभार देऊन संजय पांडे यांना महासंचालक पदी नेमणूक देण्यात आली आहे. त्यामुळे ते कायम स्वरुपी पोलीस महासंचालक नाहीत आणि म्हणून युपीएसीने शिफारस केलेल्या तीन अधिकाऱ्यांपैकी एकाची नियुक्ती पोलीस महासंचालक महाराष्ट्र या पदावर करावी अशी मागणी या याचिकेत केली आहे.

 

याचिका दाखल झाली शब्द गुंडांना बातमी मिळाली. बातमीची प्रसिध्दी झाली आणि त्यावर ऍड. दत्ता माने यांच्या नावावर ट्रोलिंग पण सुरू झाली. ट्रोलिंगमध्ये लिहिलेले शब्द अत्यंत घाणेरडे आहेत. पण ऍड. दत्ता माने यांनी केलेली मागणी काय आहे. याचा उल्लेख कोठेच होत नाही. त्यांच्याविरुध्द झालेल्या ट्रोलिंगमध्ये एक वाक्य असे आहे की, पोलीस महासंचालक पदावर संजय पांडे राहिले तर तुमचे काय नुकसान होणार आहे. असो प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचे अधिकार आहेतच. पण पोलीस महासंचालक या पदावर आल्यानंतर संजय पांडे यांनी केलेली कामगिरी नक्कीच त्यांना त्या पदावर नियुक्ती देणाऱ्यांनाही असेल.
जनहित याचिका आणि त्यातील मागणी हा एक विषय पण संजय पांडे यांनी पोलीस महासंचालक पद सांभाळल्यानंतर कोणत्याही प्रश्नाला बगल दिलेली नाही. विशेष करून ज्या पोलीस खात्याच्या विषयी नेहमी सवतीच्या लेकरासारखी भावना ठेवून शासन वागत होते. अशा परिस्थितीत सुध्दा त्यांनी पोलीसांचे महत्व काय आहे हे शासनाला पटवून दिले. शासनाने त्यावर अनेक आदेश काढले आणि ते आदेश सध्या अंमलात येत आहेत. भारताच्या ईतिहासात कोणताही पोलीस महासंचालक थेट कर्मचाऱ्यांशी संवाद साधलेला माहित नाही. पण संजय पांडे यांनी आपल्या कार्यकाळात एकदा नव्हे तर अनेकदा आपल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यावर काय उपाय योजना करण्यात येईल यासाठी भरपूर प्रयत्न केले. कोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्याला पोलीस महासंचालकांशी थेट भेटता येते. या परिस्थितीत पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आज महाराष्ट पोलीस दल संजय पांडे यांना आपला देव मानते. संजय पांडे यांना ही उपाधी जर जवळपास दीड लाख व्यक्तींनी दिली असेल तर अशा परिस्थितीत त्यांना त्या पदावरून काढल्यानंतर त्याचा परिणाम त्या दिड लाख लोकांच्या कार्यक्षमतेवर पण होणार आहे. म्हणून त्यांना काढण्याची मागणीच चुकली आहे.
न्यायालय या प्रकरणात काय निर्णय घेईल हा न्यायालयाचा प्रश्न आहे. पण न्यायालयासमक्ष मागणी करणाऱ्यांनी कोणत्या कारणाच्या आधारावर ही मागणी केली. त्यांचा बोलवता धनी कोणी वेगळा आहे काय? आणि असे असेल तर ऍड. दत्ता माने यांनी का ही याचिका दाखल केली असेल? राज्यात पोलीस महासंचालक संजय पांडे नव्हे तर असंख्य अधिकाऱ्यांकडे तात्पुरते पदभार आहेत आणि त्या तात्पुरत्या पदभारावर त्यांनी जनतेला लुटले आहे. कमीत कमी संजय पांडे बद्दल असे बोलण्यासाठी त्यांनी कधीच जागा दिलेली नाही अशा परिस्थितीत पोलीस महासंचालक पदावर संजय पांडेच राहावेत अशी अपेक्षा आहे. या संदर्भाने आम्ही एका कवीचे वाक्य उल्लेखीत करू इच्छीतो, “उलटी चलती हवाओं से न घबरा ए उखाब (पक्षी) ये तो चलती है तुझे उंचा उडाने के लिये’.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.