नांदेड(प्रतिनिधी)-जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि सध्या नांदेडमध्ये पत्रकारीता करणारे राजेंद्रसिंह उर्फ राजू परदेशी यांच्या वडीलांचे निधन झाले आहे.
नांदेड येथे पत्रकार असलेले राजेंद्रसिंह उर्फ राजू परदेशी यांचे वडील मोतिसिंह रतनसिंह परदेशी (85) हे अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे पुण्यात उपचार घेत होते. 31 डिसेंबर 2021 रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर जालना जिल्ह्यातील पाथरवाला गावात अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. राजूसिंह परदेशी यांच्या दु:खात वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा सहभागी आहे.
