नांदेड(प्रतिनिधी)-11 ऑगस्ट 2021 रोजी श्रीनगर भागात सोनु कल्याणकर याच्यावर बंदुकीतून हल्ला झाला. या प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले असून त्यांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
दि.11 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9 वाजेच्यासुमारास अनिकेत उर्फ सोनु अशोक कल्याणकर हा युवक आपल्या कार्यालयात बसला असतांना दोन जणांनी त्याच्यावर अग्नीशस्त्रातून हल्ला केला. सुदैवाने कांही हाणी झाली नाही. पण या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 34 नुसार भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पाठपुरावा करून या प्रकरणातील आरोपींची शोध मोहिम सुरूच ठेवली. या प्रकरणात गोळीबार करणारा आरोपी आशिष सपुरे हा आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने अखेर बलप्रितसिंघ उर्फ आशीष नानकसिंघ सपुरे (24), प्रितेश बाबूराव परघणे(26), अफजल खान मुसा खान पठाण(33) एस.टी.महामंडळ मेकॅनीक, रोहित मारोतराव इंगळे(21), शुभम सिताराम चव्हाण (29) लिपीक एस.टी महामंडळ, सुमित अशोक एमले (20) अशा 6 जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील आशिष सपुरे विरुध्द 19 सप्टेंबर रोजी देगलूर नाका परिसरात एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात जबरीचा गुन्हा ज्या ठिकाणी दाखवण्यात आला त्या पेक्षा मुळ लुटीचे ठिकाण हा एक जुगार अड्डा आहे. पण जुगार अड्ड्यात लुट झाली असे त्या गुन्हा क्रमांक 665/2021 मध्ये नमुद नाही.
