नांदेड

गुरूवारी कोरोनाने कालपेक्षा थोडेसे कमी रुग्ण दिले; आजची रुग्ण संख्या 36; अतिगंभीर रुग्ण 5 

नांदेड,(प्रतिनिधी)- आज गुरूवारी कोरोना विषाणूने 36 नवीन रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 137 आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी  96.92 झाली आहे.
                     जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक 6 जानेवारी रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज 36 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत.
                     नांदेड मनपा विलगिकरणातून-01, खाजगी रुग्णालय- 01 अश्या रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 87890 झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण 96.92 टक्के आहे.आज सापडलेले कोरोना रुग्ण नांदेड मनपा-14, मुदखेड-07, कंधार-01, किनवट-04, परभणी-01, नांदेड ग्रामीण-01, नायगाव-01, पुणे-01, बिलोली-01, चंद्रपुर-01, माहुर-01, हिंगोली-03 असे आहेत.
                   आज 928 अहवालांमध्ये 883 निगेटिव्ह आणि 36 पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 90682 झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत 28 आणि 08 अँटीजेन तपासणीत असे एकूण 36 रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी अहवाल 00 प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 09 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 00 आहेत.
                       आज कोरोनाचे 137 ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -108, नांदेड जिल्हाच्या तालुक्यातील विलगीकरण-15,सरकारी रुग्णालय विष्णूपुरी-07 खाजगी रुग्णालयात- 05, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल नांदेड-02 असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात 05 रुग्ण आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.