

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील ए.टी.एस.पथकाने गंगानगर भागातील 10 किलो 844 ग्रॅम गांजा पकडला. आज दि.4 जानेवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.बी.कुलकर्णी यांनी गांजा बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या या माणसा 7 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नांदेड येथील ए.टी.एस. पथकातील लोकांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हमला मस्जिद, गंगानगर या भागात तपासणी केली असता तेथे तवर खान अनवर खान पठाण (37) याच्या घरात 10 किलो 844 ग्रॅम गंाजा सापडला. एटीएस पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिता चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तवर खान अनवर खान पठाण विरुध्द अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यातील कलमे 8 आणि 20 (ब) नुसार गुन्हा क्रमांक 9/2022 दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास नांदेड ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांच्याकडे देण्यात आला.
आज दि.4 जानेवारी रोजी संकेत दिघे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार शेख रब्बानी, पवार, आणि पाटील यांनी तवर खानला न्यायालयात हजर केले. पकडलेला गांजा आणि त्यातील गांभीर्य न्यायालयासमक्ष मांडून संकेत दिघे यांनी पोलीस कोठडीची मागणी केली ती न्यायालयाने 7 जानेवारी पर्यंत मंजुर केली आहे.