

नांदेड(प्रतिनिधी)-31 डिसेंबर रोजी सिडको जे-3 भागातील 21 वर्षीय युवती कॉलेजला जात आहे असे सांगून घरातून निघाली आणि परत आली नाही. या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीसांनी या युवतीच्या शोधासाठी शोध पत्रिका जारी केली आहे.
हडको भागात राहणारे राजेश्र्वर गंगाधर पोतदार यांनी दिलेल्या खबरीनुसार त्यांची मुलगी तेजश्री (21) ही 31 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता कॉलेजला जात आहे म्हणून निघाली ती परत आलीच नाही. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या खबरीनुसार मिसिंग क्रमांक 1/22 दाखल केला आहे. या बाबतचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक एस.एल. शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे.
पोलीसांनी जारी केलेल्या शोध पत्रिकेनुसार घरातून निघून गेलेली युवती तेजश्री तिचा रंग सावळा आहे. तिची उंची 5 फुट आहे. केस काळे आहेत. तिने काळी जिन्स पॅन्ट आणि लाल रंगाचा टि शर्ट परिधान केलेला आहे. तिचा उजवा पाय आखुड आहे. तिला मराठी व हिंदी भाषा बोलता येते. पोलीस अंमलदार एस.एल. शिंदे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, घरातून निघून गेलेल्या या युवतीबद्दल कोणास काही माहिती असेल तर त्यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे याबद्दलची माहिती द्यावी. पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचा दुरध्वनी क्रमांक 02462226373 यावर आणि पोलीस अंमलदार एस.एल.शिंदे यांचा मोबाईल क्रमांक 9511851737 यावर सुध्दा युवतीबद्दल माहिती देता येईल.