

नांदेड(प्रतिनिधी)-कुसूम सभागृहाजवळ एक जबरी चोरी झाली. मौजे चिखली ता.कंधार येथे एक घरफोडी झाली. शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या. तसेच किनवट येथून एक दुचाकी गाडी चोरला गेली. या सर्व चोरी प्रकारामध्ये मिळून 1 लाख 24 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
पुंडलिक रुद्राजी रामपुरे हे 18 वर्षीय विद्यार्थी तीन डिसेंेबर रोजी रात्री आयटीआय ते डॉ.शंकरराव चव्हाण पुतळ्याकडे मोबाईलवर बोलत पायी जात होते. यावेळी मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून नेला आहे. या मोबाईलची किंमत 4 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक रोडे अधिक तपास करीत आहेत.
मौजे चिखली ता.कंधार येथील महेश बालासाहेब पाटील यांनी दिलेल्या एका तक्रारीनुसार दि.28 डिसेंबरच्या रात्री ते 29 डिसेंबरच्या पहाटे दरम्यान त्यांचे घरफोडून चोरट्यांनी त्या घरातील 24 हजार 500 रुपयांचा ऐवज, रोख रक्कम 20 हजार रुपये आणि गावातील दुसरे व्यक्ती प्रदीप सुभाष यांचा एक मोबाईल चोरुन नेला आहे. चोरी झालेल्या एकूण ऐवजाची किंमत 55 हजार 400 रुपये आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पवार अधिक तपास करीत आहेत.
शहरातील इतवारा भागातून दोन आणि किनवट येथील गोकुंदा येथून एक अशा 65 हजार रुपये किंमतीचा तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.