

नांदेड(प्रतिनिधी)-आज 2021 च्या शेवटच्या दिवशी निरिक्षण बालगृह मुलांचे येथे बाल न्यायमंंडळाच्या प्रधान दंडाधिकारी मयुरा यादव यांनी निरिक्षण गृहात राहणाऱ्या बालकांना नवीन वर्षाच्या शुभकामना दिल्या.
नांदेड येथील निरिक्षण मुलांचे येथे आज नांदेड चाईल्ड लाईन 1098 आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या पुढाकारातून विधीसंघर्षग्रस्त बालकांना ब्लँकेट्स, शालेय साहित्य आणि फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. सामाजिक बांधीलकीतून आज विविध उपक्रम लोक राबवतात त्यातीलच हा एक कार्यक्रम. आज रात्री 9 वर्षाची सुरूवात होणार आहे. त्यात सर्व जण मग्न आहेत. अशा परिस्थितीत निरिक्षण गृह, बालगृह येथे मंडळाच्या प्रधान न्यायदंडाधिकारी मयुरा यादव यांनी निरिक्षण गृहातील बालकांना आपले भविष्य कसे घडवावे. याबद्दल मार्गदर्शन करून नवीन वर्षाच्या शुभकामना दिल्या.
या प्रसंगी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अब्दुल रशिद शेख यांनी काही कारणांमुळे तुमचे अपुर्ण राहिलेले शिक्षण पुर्ण करण्यासाठी काय करावे याबद्दल बालकांना माहिती दिली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी बालकांना परत कोणत्याही गुन्ह्यात न जाण्याबद्दल मार्गदर्शन केले. येथून बाहेर पडल्यावर आदर्श नागरीक बनून काम करावे आणि येथे येणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकांसमोर आदर्श ठेवावा असे विद्या अळणे यांनी सांगितले. निरिक्षण गृहाचे अधिक्षक एस.के.दवणे यांनी तुम्ही ज्या कारणांसाठी येथे आला आहात त्या कारणांची पुर्नरावृत्ती होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याची सुचना केली. या कार्यक्रमात शितल डोंगेे, शंकर शिंगे, प्रमोद ओपळकर, चाईल्ड लाईनच्या आशा सुर्यवंशी आणि आकाश मोरे उपस्थित होते..