नांदेड (ग्रामीण)

भोकर पोलीसांनी 18 दुचाकी गाड्या पकडल्या ; गाडीची ओळख पटवून घेवून जाण्याचे पोलिसांचे आवाहन 

नांदेड(प्रतिनिधी)- भोकर पोलीसांनी एका चोरट्याला पकडून 5 लाख 50 हजार रुपयांच्या 11 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. दुसऱ्या चोरट्याकडून 2 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. एकूण दुचाक्यांमधील कांही दुचाकी गाड्या भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या आहेत. इतर चोरीची वाहने गाडी मालकांनी ओळखपटवून भोकर पोलीस ठाण्यातून घेवून जावीत असे आवाहन भोकरचे पोलीस निरिक्षक विकास पाटील यांनी केले आहे. 
                              भोकर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी अनिल उत्तम गवारे रा.बळीरामपुर यास अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याने दुचाकी गाड्या चोरल्याची कबुली दिली. आणि 5 लाख 50 हजार रुपयांच्या 11 दुचाकी गाड्या पोलीसांना दिल्या. त्या 11 मधील 8 दुचाकी गाड्या पोलीस ठाणे भोकरच्या हद्दीतून चोरीला गेल्या आहेत. टाकराळा गावातील बाबु मामीलवाड याला पकडून पोलीसांनी घेतलेल्या माहितीनुसार त्याने दुचाकी गाड्या चोरल्याची कबुली देत 2 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 5 दुचाकी गाड्या पोलीसांना काढून दिल्या आहेत. त्या पाच मधील एक दुचाकी गाडी भोकर येथील आहे. अशा प्रकारे भोकर पोलीसांना दोन चोरट्यांनी  18   दुचाकी गाड्या चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यापैकी 14 दुचाकी गाड्या जप्त आहेत. भोकरचे पोलीस निरिक्षक विकास पाटील यांनी जनतेला आवाहन केले आहे. की, आपल्या चोरीला गेलेल्या दुचाकी गाड्यांची ओळख पटवून भोकर पोलीस ठाण्यातून त्या गाड्या घेवून जाव्यात. 
                     ही कार्यवाही भोकरचे पोलीस उपनिरिक्षक अनिल कांबळे, पोलीस अंमलदार दिलीप जाधव, व्यंकट आलेवार, मोहन खेडकर आदींनी केली. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक गोपाळ रांजणकर, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी भोकर पोलीसांचे कौतुक केले आहे. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.