नांदेड(प्रतिनिधी)-एका 60 वर्षीय महिलेला गणपती मंदिर बहाद्दरपुरा येथे दोन चोरट्यांनी फसवणूक करून त्यांची 12 ग्रॅमची सोन्याची पोत, 20 हजार रुपये किंमतीची लंपास केल्याचा प्रकार घडला आहे.
25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता गणपती मंदिर बहाद्दरपुरा ता.कंधार येथे गंगाबाई संभाजी वंजे (60) ह्या दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी दोन 30 ते 35 वयोगटाचे युवक आले. त्यांनी आपल्या तोंडा मास्क लावलेला होता. नवस फेडायला आलो आहोत अशी बतावणी करून त्या महिलेच्या गळ्यातील 12 ग्रॅम वजनाची, 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत या ठग सेनानी काढून घेतली. गंगाबाई वंजे यांच्या तक्रारीवरुन कंधार पोलीसांनी गुन्हा क्रमांक 448/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक पडवळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार श्रीरामे करीत आहेत.
