क्राईम

उमरखेड येथून चोरलेल्या दोन दुचाकी गाड्या स्थानिक गुन्हा शाखा नांदेडने अडीच वर्षानंतर पकडल्या 

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने उमरखेड येथून सन 2019 मध्ये चोरी करून त्या दुचाकी गाड्या वापर असलेल्या दोघांना पकडून गाड्यांसह त्या दोघांची रवानगी उमरखेड पोलीसांकडे केली आहे. 
                      दि.26 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार दशरथ जांभळीकर, बालाजी तेलंग, संजीव जिंकलवाड, विलास कदम, गणेश धुमाळ, मोतीराम पवार, रणधिर राजबन्सी हे गस्त करत असतांना स्वागत मंगल कार्यालयाच्या पाठीमागे एम.एच.38 क्यु.9872 आणि एम.एच.37 के.8718 या दोन गाड्यांसह नागेश किशन वाठोरे (26), रा.उमरी ता.हदगाव आणि दादाराव रामराव जोंधळे (42)रा.तुप्पा ता.कळमनुरी जि.हिंगोली असे दोन व्यक्ती सापडले. या लोकांकडे दुचाकी गाड्यांची कागदपत्रे मागितली असता कागदपत्र नाहीत असे त्यांनी सांगितले. तेंव्हा त्या दोन्ही गाड्यांचे इंजिन नंबर आणि चेसीस नंबर पडताळणी केली असता त्या गाड्या लिहिलेल्या क्रमांकापेक्षा वेगळ्याच असल्याचे दिसले.या चोरांनी गाड्या उमरखेड येथून चोरून आणल्याचे सांगितले. 
                      यानंतर या दुचाकी गाड्यांच्या चोरी संदर्भाने उमरखेड जि.यवतमाळ या पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 137/2019 दाखल असल्याचे दिसले. तसेच दुसरा गुन्हा 140/2019 असा आहे. अशा प्रकारे नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने हिंगोली आणि हदगाव येथील चोरटे ज्यांनी गाड्या चोरल्या उमरखेड येथे आणि पकडल्या नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने अशी कार्यवाही केली आहे. दोन्ही गाड्या आणि चोरटे उमरखेड पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.