नांदेड(प्रतिनिधी)-एस.टी.महामंडळातील कर्मचारी भिमराव नागोराव सदावर्ते यांनी आज आपल्या राहत्या घरी वसरणी भागातील भुखंडावर कच्या घरात नॉयलॉन दौरीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
नागेश भिमराव सदावर्ते यांचे वडील भिमराव नागोराव सदावर्ते हे एस.टी.विभागात वाहक या पदावर किनवट आगारात कार्यरत होते. आज सकाळी 9 वाजता नागेश सदावर्तेने त्यांच्या वसरणी येथील भुखंडावर विटा रचून तयार करण्यात आलेल्या एका रुममध्ये वडीलांचा मृतदेह दौरीला लटकेला पाहिला. याबाबत नांदेड ग्रामीण पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलीसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यू क्रमांक 124/2021 दाखल केला असून पुढील तपासाची जबाबदारी महेश कौरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
भिमराव नागोराव सदावर्ते यांचे वय 57 वर्षे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगी असा परिवार आहे. एस.टी.विभागातील अनेक वाहक, चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी सदावर्ते यांच्या घरी भेट दिली.
अतिक्रमण धारक दिलीप पांडरे यांना पाठिशी घालणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी मुखेड( प्रतिनिधी ):-बिलोली तालुक्यातील मौजे लोहगाव येथील ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर राजश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या नावाने अनाधिकृतपणे कार्यालय उभारून संस्थेचे अध्यक्ष दिलीप पांडरे यांच्या वतिने हे अतिक्रमण करण्यात आले.या अतिक्रमण धारकाच्या आर्थिक सहकार्यातून व राजकीय दबावापोटी गेल्या अनेक दिवसापांसुन पाठीशी घालणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात यावे.व […]
अर्धापूर (प्रतिनिधी)केंद्रीय मंत्री लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिना निमित्त दि.३ गुरूवारी रोजी भाजपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिना निमित्त भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख,विराज देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून पुष्ष हार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा शहराध्यक्ष विलास साबळे,भाजयुमोचे जिल्हा चिटणीस […]
अर्धापूर(प्रतिनिधी)-शहरातील गवळी गल्ली येथील दिपक फलाजी विरकर वय 40 वर्षे यांचे दि.1 जुन बुधवार रोजी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज दि.2 जुन गुरुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता अर्धापूर येथे होणार आहे. अर्धापूर शहरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून वृत्तपत्र विक्रेता म्हणून अनेक दैनिकांचे अविरतपणे वितरण करणारे व अर्धापुर शा. गोदावरी अर्बन बॅंकेचे बचत ठेव […]