

नांदेड (प्रतिनिधी)-येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरेफ खान पठाण यांनी कृष्णूर शासकीय धान्य घोटाळा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आणला व त्यानंतर अनेक प्रकरणात प्रशासनाचे डोळे उघडणारे तसेच भ्रष्टाचार बनावट जातीचे प्रमाणपत्र आणि वक्फ बोर्ड जमिन घोटाळा अशा अनेक प्रकरणांचा उलगडा करणारे धाडसी व अभ्यासू वृत्तीचे समाज कार्यात, योगदानात महत्वाचे पाऊल टाकणारे आणि त्यानंतर वर्तमान पत्रात भरारी घेत काही दिवसातच उल्लेखनिय कामगिरीचा ठसा उमटवित यश मिळविलेले नांदेड चौफेरचे संपादक मोहम्मद आरेफ खान यांना एका महिण्याच्या कालावधीत दोन पुरस्कार मिळाले. नांदेडचे भूमिपूत्र यांना सन्मान मिळालेलेला असून आणखीन एक जिल्हा पुरस्कार मिळवून एका वर्षाच्या कालखंडात तीन पुरस्कार बहूमान मिळलेला आहे यामुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षात होत आहे.
प्रथम पुरस्कार औरंगाबाद येथे समिक्षा कर्तत्व सन्मान पत्रकारिता पुरस्कार, जिल्हास्तरीय रुपेश पाडमूख (संपादक) यांच्या साक्षिने मिळाला आहे, त्यानंतर दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार नाशिक येथे दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी समाज भूषण पुरस्कार, सौ. करुणाताई धनंजय मुंडे (सामाजिक न्यायमंत्री यांच्या पत्नी) व भाऊसाहेब शिंदे यांच्या साक्षिने मिळालेला आहे. जो उत्तमरित्या सामाजिक राजकिय, व इतर क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व काल दि. २३ डिसेंबर २०२१ रोजी अहमदनगर येथे स्वराज्य सरपंच सेवा संघ संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे , दिपक पाटील, रोहित पवार, बाबासाहेब पावसे, प्रमिला एखंडे, यांच्या हस्ते व सौ. करुणाताई धनंजय मुंडे यांच्या साक्षिने परत दुसरा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यामुळे नांदेड चौफेरचे संपादक मोहम्मद आरेफ खान पठाण यांच्या वृत्तपत्राची दखल घेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून होते.हे पुरस्कार मिळण्याने सिध्द झाले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांची नोंद संपूर्ण राज्यात होत आहे आणि कौतूकही होत आहे.
सामाजिक व वृत्तपत्र कार्यक्षेत्रात एक आदर्श निर्माण करीत असून त्यांचे दैनिक नांदेड चौफेर हे कोणत्याही दबावाला व अमिषाला बळी न पडणारा नांदेड जिल्हयात एकमेव मुखपत्र असून अशा धाडसी व जिद्दी चिकाटीने ठसा उमटविणारे मोहम्मद आरेफ खान पठाण असून आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव सोबत राहणार अस गौरवोद्दगार सौ. करुणाताई धनंजय मुंडे यांनी प्रशंसा करीत यशाची पाठ म्हणून त्यांची पाठ थोपटली आहे आणि तो एक आदर्श व्यक्तीमत्व असलेल्या जनमाणसांसोबत पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा माझा मानस आहे असा उल्लेख करुन पठाण यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे व पठाण यांना त्यांनी केलेल्या कार्याची पावती आज सरपंच सेवासंघ अहमदनगर माउली सभागृहात हजारो सरपंचांच्या साक्षिने पुरस्कार दिलेला आहे. यावेळी बाबासाहेब पावसे, आचार्य मंहत महामंडलेश्वर जगदगुरु डॉ. रामकृष्णदास लहवित्तकर महाराज, दिपक पाटील, हभप राधाताई सानप, डॉ. राधेश्याम गूंजाळ, राजाराम भापकर गुरुजी, विजयकुमार तानपूरे, लाभेल औटी, यादवराव पावसे, सुरेशराव कौते, विजयाताई काचावार, एकनाथराव ढाकणे, धनंजय विसपूते, प्रमुख पाहूणे होते तर नांदेडचे अँड. ईमामसाब, साहेबराव कोलंबीकर, डॉ. फहीम शेख, सुलेमान खान, आमेरखान, आदी उपस्थित होते हा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल अनेक मान्यवर, नातेवाईक व पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांकडून शूभेच्छांचा वर्षाव होत आहे.