

भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या पाच दुचाकी गाड्या शोधल्या
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने 5 दुचाकी गाड्याबाबत शोध घेवून त्या दुचाकी गाड्या चोरलेल्या व्यक्तीविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याची विनंती भोकर पोलीसांना केली आहे. तसेच जबरी चोरीचा एक गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील उघडकीस आणला असून 20 हजार रुपयांच्या मुद्देमालासह एक आरोपी त्यांच्या स्वाधीन केला आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 696/2020 या जबरी चोरी प्रकरणात जबरी चोरी करणारा सय्यद अल्ताफ सय्यद रफिक (28) रा.बिलालनगर नांदेड याच्याकडून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी ती वेगवेगळे मोबाईल जप्त केले. सय्यद अल्ताफने चोरलेले मोबाईल आणि त्याच्यासह स्थानिक गुन्हा शाखेने नांदेड ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
दुसऱ्या एका घटनेत स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार किनवट शिवारातील मौजे पिंपळगाव या रस्त्यावर कांही चोरलेल्या मोटारसायकली ठेवलेल्या आहेत. याची तपासणी केली असता त्या पाच दुचाकी गाड्या किंमत 1 लाख 90 हजार रुपयांच्या भोकर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 41, 301, 325, 394 आणि 398/2021 मध्ये चोरीला गेलेल्या आहेत. स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी या गाड्या अनिल उत्तम गवाले रा.गंगानगर किनवट याने चोरलेल्या आहेत. याचाही शोध घेतला. या गाड्या भोकर पोलीसांच्या स्वाधीन करून अनिल उत्तम गवालेला अटक करून तपास करण्याची विनंती भोकर पोलीसांना करण्यात आली आहे.
या दोन्ही कार्यवाही स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, पोलीस अंमलदार विलास कदम, घुगे, गणेश धुमाळ,रवी बाबर, बालाजी यादगिरवाड, हनुमानसिंह ठाकूर, संजय केंद्रे, विलास कदम, गणेश धुमाळ आणि हेमंत बिचकेवार यांनी पुर्ण केली.