नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची दोन लाख ३२ हजार पाचशे रुपये असा ऐवज असलेली बॅग चोरीला गेली आहे.या प्रकरणातील ऑटो चालकाला न्यायालयाने पोलीस कोठडीत पाठवले आहे.
औरंगाबाद येथील सौ.आरती खंडूजी शेळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता त्या हडको बसस्टॉप ते रेल्वेस्टेशन जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या होत्या. त्यांच्यासोबत तीन लहाने मुले व आई होत्या. त्यांनी हडको बसस्टॉपवरुन ऑटोमध्ये बसल्या. या दरम्यान ऑटो चालकाने अतिरिक्त प्रवाशी घेण्याच्या कारणासाठी सौ. आरती शेळकेची दिशाभूल करुन ऑटोमधील बॅग ज्यामध्ये कपडे आणि सोन्या, चांदीचे दागिणे असा २ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. ही बॅग लंपास केली. नांदेड ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक आनंद बिच्चेवार अधिक तपास करीत आहेत.
या प्रकरणी आनंद बिच्चेवार यांनी लाखो रुपयांची बॅग लंपास करणारा ऑटो चालक पुरुषोत्तम सुभाष कोटलवार (४४) रा.हडको यास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
