नांदेड

आता अन्न वर्तमान पत्रात बांधून द्याल तर याद राखा कार्यवाही होणार 

नांदेड,(प्रतिनिधी)-अन्न पॅकींग करुन घेत असताना ते अन्न वर्तमानपत्रामध्ये बांधून मिळते. कोठे खायचे असेल तर ते वर्तमानपत्रात ठेवून दिले जाते. या सर्व प्रकारांवर अन्न व औषध विभाग पुणे येथील सह.आयुक्त एस.एम.देसाई यांनी त्यावर पूर्ण बंदी केली असल्याचे एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे जाहीर केले आहे.
सह.आयुक्त अन्न एस.एम.देसाई यांनी प्रसिध्दीसाठी पाठविलेल्या पत्रकानुसार अन्न सुरक्षा व मानके कायदा सन २००६ हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ५ ऑगस्ट २०२१ पासून लागू आहे. या कायद्याचा मूळ उद्देश जनतेस सुरक्षित,सकस, निर्भेळ अन्न उपलब्ध व्हावे हा आहे. अनेकदा बाहेरुन नाष्टा, जेवण मागवित असताना अन्न व्यवसायिक हे वडापाव, पोहे, आणि इतर अन्न पदार्थ वर्तमानपत्रामध्ये बांधून देतात. त्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. कारण वर्तमानपत्राची शाही ही रासायनिक प्रक्रियेतून बनवलेली असते.  आणि ते रासायनिक मिश्रण वापरुन वर्तमानपत्राची छपाई होत असते. अशा वर्तमानपत्रामध्ये गरम खाद्यपदार्थ पॅकींग करुन देणे, ग्राहकांच्या हातात देणे हे धोकादायक आहे. त्यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) यांच्या वतीने असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत की, अन्नाचा व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक, मोठे हॉटेल, बेकरी, स्नॅक्स सेंटर, स्वीट मार्ट, वडपाव, भजे व भेळ विक्रेते हे सर्रासपणे वर्तमानपत्राचा वापर करुन अन्न पुरवठा करतात. यानंतर ग्राहकांनी सुध्दा वर्तमानपत्रात पॅकिंग केलेले अन्न स्विकारु नये, आणि व्यावसायिकांनी त्यांना ते देवू नये नाही तर व्यावसायिकाविरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि नियम व नियमन २०११ नुसार कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *