क्राईम

50 लाखांची बॅग चोरणाऱ्या चोरट्यांसाठी पोलीसांनी जारी केली शोध पत्रिका

नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील बाफना टी पॉईंटजवळ 50  लाखांची बॅग घेवून पळ काढणाऱ्या चोरट्यांची माहिती मिळविण्यासाठी इतवारा पोलीसांनी चोरट्यांच्या एका फोटोसह शोध पत्रीका जारी केली आहे.
15 डिसेंबर रोजी शहरातील बाफना टी पॉईंटजवळ कविता रेस्टॉरंटसमोरच्या रस्त्यावर चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.26 ए.के.7648 उभी करून चालक बाहेर गेला होता. त्यावेळी त्या गाडीचे डावीकडील खिडकीचा काच उघडा होता. या उघड्या काचेतून त्यात ठेवलेली 50 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग एका चोरट्याने काढली आणि दुसरा चोरटा दुचाकी घेवून आला आणि बॅगसह त्या दुचाकीवर बसलेला चोरटा खाली सुध्दा पडला. तरीपण त्या चोरट्यांनी ती बॅग घेवून जुना मोंढाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे निघून गेले. याबाबत इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 307/2021 दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस विभागाने खुप मेहनत घेतली आहे. पण आता पोलीसांनी या चोरट्यांबाबत शोध पत्रिका जारी करून जनतेला मदत मागितली आहे. या छायाचित्रात दिसणारा व्यक्ती काळ्या रंगाचा असून चेहरा लांबट आहे, नाक सरळ आहे, उंची 5 फुट 5 इंच असले. त्याचा शरीर बांधा मजबुत आहे. त्याच्या अंगावर दिसणारे कपडे पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळा जिन्स पॅन्ट दिसत आहे. पोलीसांनी जनतेला आवाहन केले आहे की, छायाचित्रात दिसणारे दोन चोरटे दिसले तर याबाबत पोलीसांना माहिती द्यावी. इतवाराचे पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांचा मोबाईल क्रमांक 7798648865,  इतवाराचे पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांचा मोबाईल क्रमांक 9561045306 आणि पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके यांचा मोबाई क्रमांक 9146663355  यावर सुध्दा माहिती दिली तर पोलीसांना या चोरट्यांना शोधण्यात मदत होणार आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *