
कंधार, (प्रल्हाद दे. आगबोटे) – बालाजी डुबुकवाड अमर रहे,अमर रहे या गगनभेदी आवाजात शत्रुंना पाणी पाजवत वीर मरण पत्कारलेल्या बालाजी श्रीराम डुबुकवाड यांना हजारो साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी गावचे सुपुत्र जवान बालाजी डुबुकवाड हे जम्मु कश्मिरमधील कुपवाडा येथे १८ डिसेंबर शत्रूंशी दोन हात करत त्यांनी आपले जीवन देश्यासाठी अर्पण केले.
भारतीय सैन्यदलातील 101 INF BN (टी ए ) मराठा LI दलातील लान्स नायक बालाजी श्रीराम डुबुकवाड यांना भारत मातेचे रक्षण करताना जम्मु कश्मीर (कुपवाडा) येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले त्याचा अत्यविधी त्याच्या मुळ गावी बाचोटी येथे 20 डीसेबर रोजी सायंकाळी पाच वाजताहजारोंच्या जनसागर उपस्थीतत करण्यात आला.
विरजवान बालाजी डुबुकवाड यांचे पार्थीव कंधार शहरात दुपारी बारा वाजता आले कधार शहरामध्ये खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी कंधार येथील खासदार कार्यालया समोर पार्थीवाचे दर्शन घेवुन श्रद्धांजली वाहिली त्याच बरोबर राष्ट्रवादीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष हरीहरराव भोसीकर याच्या कंधार येथील कार्यालया समोर पार्थीवाचे दर्शन घेवुन श्रध्दाजली वाहीली. माजी सैनिक संघटनेचे नादेड जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड याच्या सघटनेच्या वतीने बसस्थानका जवळ पार्थीवाचे दर्शन घेवुन श्रध्दाजली वाहाण्यात आली कंधार पचायत समितीच्या वतीने श्रध्दाजली वाहाण्यात आली श्री शिवाजी चौक येथे मोठ्या जनसमुदयाच्या उपस्थीतीत खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी पार्थीव्हाचे दर्शन घेवुन श्रद्धांजली वाहाली वीर जवानाची अंतिम याञा कंधार,बहादरपुरा, मानसपुरी ते बाचोटी येथे दुपारी तीन वाजता पोहचली. विरजवान बालाजी श्रीराम डुबुकवाड याचा अंत्यविधी त्याच्या शेतात करण्यात आला. यावेळी राज्याचे बाधकाम मञी व नांदेड जिल्ह्याचे पालक मंञी ना. अशोकराव चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर ,आं शामसुंदर शिदे, आ. अमर राजुरकर, आ. मोहन आण्णा हंबर्डे, माजी आ. शंकर आण्णा धोडगे, माजी आ. रोहीदास चव्हाण, जिल्हाधिकारी विपीन, नादेड जिल्हा परिषदच्या मुख्याधिकारी वर्षा ठाकुर, नांदेड पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, कंधार उपविभागिय अधिकारी शरद मंडलीक, कंधारचे तहसीलदार संतोष कामठेकर ,लोहा तहसीलदार व्यंकटेश मुंडे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बालाजी चुकलवाड , माजी जि.प.सदस्य रामचंद्र येईलवाड, माजी जि.प.सदस्य संगिता धोंडगे ,जि.प सदस्य अँड विजय धोंडगे, नगर पालीका माजी उपाध्यक्ष व विद्यमान नगर सेवक मन्नान भाई चौधरी, माजी जि.प. सदस्य. डाॅ. प्रा. पुरुषोतोम धोडगे, माजी आयस अधिकारी अनिल मोरे, वंचित बहुजन वंचित आघाडीचे नादेड जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, राजकुमार केकाटे मधु पाटील डांगे, गणेश कुंठेवार, भाजपा नादेड जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर, भाजपा शहर अध्यक्ष गंगाप्रसाद येन्नावार, भाजपा तालुका अध्यक्ष भगवान राठोड ,सेवानिवृत कॅपटन संजय कदम, कॅपटन कपाळे, कॅपटन कस्तुरे, माजी सैनिक आयुब पठाण, ज्ञानेश्वर डुमणे, माजी सैनिक भगमान नागरगोजे, किशोर नरपञे, पोचिराम वाघमारे, अर्जुन कांबळे याच्यासह हजारो नागरीक विविध राजकिय पक्षातील कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते. राज्याचे बाधकाममंञी आशोक चव्हाण व खा. प्रतापराव पाटील चिखलीकर उपस्थित सर्व आमदार यानी बालाजी डुबुकवाड याना पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दाजली वाहीली. प्रथम सैन्य अधिकारी यानी सलामी दिली व नादेड पोलीसांच्या वतीने सलामी देण्यात आली. विरजवान बालाजी डुबुकवाड याचे छोटे भाऊ गंगाधर डुबुकवाड यांनी पार्थिवास अग्नी दिला.यावेळी परीसरातील हजारो नागरीक ऊपस्थित होते

Post Views:
545