नांदेड

मानव मुक्ती दिनानिमित्त मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय संविधान दिनाचे औचित्यसाधून संविधान गौरव महोत्सवाच्या औचित्याने शाळेतील होतकरु आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप दि.20 डिसेंबर रोज सोमवारी होणार आहे.
भारतीय संविधान गौरव महोत्सावाच्या औचिात्याने आता मानव मुक्ती दिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून शिवाजीनगर पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक आनंत नरुटे हे राहणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून विजयदादा सोनवणे, माधवदादा जमदाडे, ऍड. स्वप्नील कुलकर्णी, ऍड. अविनाश भोसीकर, कुलदीप चिकाटे, डॉ. विलासराज भद्रे, ऍड. कमलेश चौदंते, कैलास सावते, एकनाथ ब्राम्हणवाडेकर, प्रविण जेठेवाड, मिलिंद शिराढोणकर, शरद सोनवणे, डॉ. प्रशांत सब्बनवार, प्रतीक मोरे, इलियाझ पाशा, भारतीबाई सदावर्ते, गयाताई कोकरे, राहुल चिखलीकर, गंगाधर गायकवाड, शिवाजी गेडेवाड, विनोद गोविंदवार, दिलीप जोंधळे, सुनील सोनसळे, किरण फुगारे, संदिप खिराडे यांची उपस्थितीत राहणार आहे.
या कार्यक्रमात गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप दि.20 डिसेंबर रोज सोमवार सायंकाळी 7 वाजता त्रिरत्न विहार डॉ.आंबेडकनगरनगर नांदेड येथे केले गेले आहे. याचबरोबर कार्यक्रमाच्या शेवटी “जय भीम’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रा.राजू सोनसळे यांनी दिले.
या कार्यक्रमासाठी राहुलभाऊ सोनसळे, ऍड. यशोनील मोगले, सचिन वायवळे, महेश पंडीत, राहुल घोडजकर, आतिश ढगे, अभय सोनकांबळे, रितेश गुळवे, रोहन कांबळे, सुबोध गजभारे, तुषार वाघमारे, सचिन भावे, टिल्लु वाघमारे, जयसेन झडते, सुबोध बनसोडे, बंटी हानमंते, रोहन कांबळे, शैलेश सरोदे, विशाल दुधमल, ऋषभ महादळे, मोरेश्वर तांबरे, संदेश मोरे, अमोल कार्ले, शंतनु डोंगरे, शुभम् वट्टमवार, साईनाथ ढवळे, संजय सरोदे हे परिश्रम घेत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.