प्रल्हाद दे. आगबोटे
कंधार-मन्याड खोऱ्यातील एक सैनिक जम्मू काश्मीर, कुपवाड येथे शहिद झाला आहे. हे जवान बालाजी श्रीराम डुबूकवाड हे आहेत. त्यांचे गाव बाचोटी ता.कंधार असे आहे.
दि.18 डिसेंबर रोजी जम्मू काश्मिरच्या कुपवाडा येथे झालेल्या हल्यात बाचोटी येथील सैनिक बालाजी श्रीराम डुबूकवाड हे शहिद झाले. ही माहिती बाचोटी येथे धडकताच गावावर, जिल्ह्यावर दु:खाची कळा पसरली. कंधारचे तहसीलदार संतोश कामठेकर यांनी शहिद जवानाचे वडील श्रीराम डुबूकवाड यांची भेट घेतली. त्यांना दुरध्वनीवरून त्यांच्या पुत्राच्या शहीदीबद्दल माहिती देण्यात आली. बालाजी डुबूकवाड हे 1 जानेवारी 2007 रोजी सैन्य दलात भरती झाले होते. वयाच्या 32 व्या वर्षी त्यांना विर मरण आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. नांदेड जिल्हा आपल्या जवानाला श्रध्दांजली अर्पण करीत आहे.
खा.चिखलीकर आणि माजी आ.धोेंडगे यांनी शहीद जवान डुबुकवाड यांना श्रध्दांजली वाहुन कुंटूबांचे केले सांत्वन
नांदेड लोकसभा मतदार संघाचे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि कंधार लोहा मतदार संघाचे माजी आमदार शंकरआण्णा धोंडगे यांनी जम्मू काश्मीर येथील कुपवाडा येथे भारत मातेची सेवा करतांना या कंधार तालुक्याचे व बाचोटी गावचे भुमिपुञ शहीद बालाजी डुबुकवाड यांना श्रध्दांजली वाहीली आहे.
बालाजी डुबुकवाड भारत मातेची सेवा करतांना शहीद झाले ही बातमी कळताच खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शहीद जवानांच्या घरी जावुन त्यांच्या कुंटुबाची भेट घेवुन सांत्वन केले तसेच या मतदार संघाचे माजी आमदार शंकरआण्णा धोंडगे यांनीही शहीद जवानाच्या घरी जावुन त्यांच्या कुंटुबाची भेट घेवुन कूंटुबाचे सांत्वन केले आहे.