नांदेड

कायदा तयार झाला असेल तर तो मानने आवश्यक-मलीक खान

नांदेड(प्रतिनिधी)-भारतात संवैधानिक मुल्य आणि मानवी हक्काची मुल्य संपली आहेत आणि यासाठी जगात भारताची बदनामी होत आहे असे प्रतिपादन जमात-ए-ईस्लामी हिंद या संघटनेचे राष्ट्रीय सचिव मलीक मोतोसिन खान यांनी केले.
डिसेंबर महिन्यात मानवी हक्क दिन असतो त्या संदर्भाने आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मलीक खान बोलत होते. यावेळी संघनेचे रियाज आमेर, जलील अहेमद, युसूफ बेग, आभरार देशमुख यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी पुढे बोलतांना मलीक खान म्हणाले, भारतात भ्रष्टाचार आणि मानवी मुल्यांच्या अधपतनासाठी जनतेने नवीन सरकार दिले होते. पण आता जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यातही बदल घडेल पण सर्वांनी एकत्रीत प्रयत्न करण्याची गरज आहे. भारतात सध्या असलेले सरकार जास्त खतरनाक आहे. तेंव्हा त्याला बदलण्यासाठी नवीन निवडणुक प्रक्रिया अंमलात आणण्याची गरज आहे. अनेक देशांमध्ये ज्या प्रमाणात पक्षाला टक्केवारी मिळेल त्या प्रमाणात त्यांना जागा मिळाल्या पाहिजे. या पध्दतीमुळे समाजातील प्रत्येक घटकाला स्थान मिळेल. नवीन सरकारने जनतेला कांहीच दिलेले नाही. त्या मानाने महाराष्ट्रातील सरकार चांगले आहे असे मलीक यांनी सांगितले. कायदा तयार झाला असेल तर त्याला पाळणे बंधनकारकच आहे. पण कायदा बनवणारे बदलणे जनतेच्या हाता आहे. जनतेसोबत झालेला धोका जनता नक्कीच बदलेल.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.